महाबळेश्वर - तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वर पासून सहा किलाे मीटर अंतरावर असलेल्या मांघर गावच्या फाट्याजवळील वळणावर कळंमगावहुन महाबळेश्वरकडे येणाऱ्या एस. टी. बस व दुचाकी अपघातात बसमधील १७ प्रवासी जखमी झाले तर बसच्या मागील चाक डोक्यावरून गेल्याने आनंद गोविंद शिंदे (वय ४५ रा कुरोशी,महाबळेश्वर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सर्व जखमींना बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
हेही वाचा - Video : तानाजी मालुसरेंची जन्मभूमीही अनसंग
महाबळेश्वर - तापोळा मुख्य रस्त्यावर कळंमगाव मुक्कामी असलेली महाबळेश्वर आगाराची बस (एम. एच. १४ बिटी. ०४९७ ) प्रवासी घेऊन महाबळेश्वरकडे निघाली हाेती. मांघर गावाच्या फाट्याजवळील तीव्र वळणावर आपल्या मुलाला महाबळेश्वर येथे सोडून परत महाबळेश्वरहुन कुरोशी गावाकडे दुचाकीवरुन (एम. एच. ११ बिपी. २२५७) निघालेले आनंद गोविंद शिंदे (वय ४५, रा कुरोशी, महाबळेश्वर) यांचा वाहनावरील ताबा सुटला अन्य दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या उद्देशाने बस चालक प्रवीण गाढवे (रा. खंडाळा) यांनी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेण्याच्या प्रयत्नात बस झाडावर आदळली. मात्र दुर्दैवाने बसच्या मागील चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच ठार झाला. बस झाडावर आदळल्याने बेसावध असलेले एस टी बस मधील १७ प्रवासी जखमी झाले यामध्ये काही शाळकरी मुले देखील होती सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही.
जरुर वाचा - एसटीला अभिमान तुमच्या प्रामाणिकतेचा
जखमींमध्ये संतोष मारुती जाधव (वय ३०), किसन रामचंद्र धनावडे (वय ६४), रोहित वसंत पवार (वय १९), सोमाजी सावजी कदम (वय ४७), धनश्री विकास जंगम (वय ३२), अरुण संतोष जाधव (वय २९), प्रतीक कमलेश जाधव (वय ८), प्रेरणा कमलेश जाधव (वय ६), रामचंद्र बाबू कदम (वय ६०), मीना गणेश उतेकर (वय ३१), गायत्री राजेंद्र सपकाळ (वय १७), ताईबाई रामचंद्र सपकाळ (वय ५५), कुसुम दिलीप शेलार (वय ४४), भाग्यवान देवजी कदम (वय ४०), दत्ताराम नारायण मोरे (वय ६०), उषा विठ्ठल शेलार (वय ४५), पार्वती किसन सपकाळ (वय ५०) यांचा समावेश आहे.
बस चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले. बसमधील सर्व जखमींना बेल एअरसह महाबळेश्वर पालिकेच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तापोळाचे सरपंच आनंद धनावडे, सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पारठे, शिवरक्षक लाईफ लाईन रेस्क्यू भोसले आदींनी दाखल केले.
हेही वाचा - गाढवांचा बंदाेबस्त करा ; राऊत, आव्हांडावर सातारकरांचा हल्लाबाेल
ग्रामीण रुग्णालय परिसरात जखमींच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. अपघातातील जखमींना एस टी प्रशासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे,माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे,किसनशेट शिंदे,हरिभाऊ सपकाळ,पंचायत समितीचे उपसभापती संजुबाबा गायकवाड,गोपाळ वागदरे,विजय नायडू,महेश गुजर,संजय कदम आदींनी जखमींची विचारपूस केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.