मोबाईल दुरुस्ती होतीये चक्क हातगाड्यावर

one person start a mobile repair shop on hand bicycle in sangli before 8 years
one person start a mobile repair shop on hand bicycle in sangli before 8 years
Updated on

सांगली : नाव रोहन चिवटे (वय 40) रा. पत्रकारनगर, सांगली. गेल्या आठ वर्षांत मोबाईल दुरुस्तीच्या क्षेत्रात हे नाव परिचयाचे झाले आहे. मोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी स्टॅंड परिसरात रोहनने चिकाटीने मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय केला. दोन वर्षांत लागोपाठ संकटाने आघात केला. एकदा महापुराने बुडवले तर चालू वर्षी कोरोनाने घात केला. या संकटातही रोहनने चिकाटी सोडली नाही, मोबाईल दुरुस्तीचा व्यवसायाची पद्धत बदलली. त्याने हा व्यवसाय हातगाड्यावर आणला. 

मोबाईल दुरुस्तीचा फलक लावलेल्या गाड्यावर कव्हर, स्क्रीन गार्ड, हेडफोन मिळतात. त्यात 12 व्होल्टची बॅटरी, डागणी, दुरुस्तीसाठी ठेवले आहे. अतिशय संकटातून रोहन धडपड करतोय, हे तेथे जाणवते. या परिसरातच त्याचे दुकान होते. त्याला भाडे पाच हजारांवर होते. ते परवडेना. महापुरात बराच काळ आणि आता कोरोना संकटात तीन-चार महिने दुकान बंद राहिले. पैसे संपले. पुन्हा सुरवात करणे कठीण होते. त्याने दुकान सोडले. पाच हजारांना जुनी हातगाडी घेतली. 

दुरुस्ती व फलकावर पाच हजार खर्च केला. सकाळी नऊ ते दुपारी एक आणि चार ते रात्री नऊपर्यंत तो व्यवसाय चालवतो. रोहनचा निश्‍चित ग्राहकवर्ग आहे. त्यांना त्याच्यावर विश्‍वास आहे. ते काम देतात. नव्या ग्राहकांना तो लगेच दुरुस्ती करून देतो. व्यवसाय थोडा कमी होतोय, मात्र भाड्याची चिंता मिटली. जे मिळतील ते स्वतःचे आहेत, अशी त्याची भावना आहे. वाहतुकीला कुठेही अडचण येणार नाही, याची खबरदारी घेऊन तो ही हातगाडी लावतो. संकटात काही संपत नाही, फक्त मार्ग बदलावा लागतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे.  

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()