नगर तालुका : नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारात आवक वाढूनही कांद्याचा भाव स्थिर होता. आज 78 हजार 376 कांदागोण्यांची (43 हजार 107 क्विंटल) आवक झाली. त्याला दहा हजारांपर्यंत भाव निघाला.
आवक कमी असल्यामुळे नेप्ती उपबाजार समितीत मागील महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळाला होता. भावाने 20 हजारांपर्यंतचा टप्पा गाठला होता. बाजार समितीत जसजशी आवक वाढू लागली, तसतशी भावात घसरण सुरू झाली होती. मात्र, तीन लिलावांपासून कांद्याने प्रतिक्विंटल दहा हजारांचा भाव टिकवून ठेवला आहे. गेल्या तीनही लिलावांत, आवक वाढली असतानाही कांद्याला दहा हजारांचा भाव मिळाला आहे.
हेही वाचा - जिल्हा परिषदेतील महिलांवर "वाकडी नजर'
जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावावर परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी प्रतवारी करून व टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस आणला, तर त्याला दहा हजारांपर्यंत भाव टिकून राहील. एकदम आवक वाढली, तर मात्र भावात घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाजारात जुना कांदा संपल्याने नवीन लाल कांद्याची आवक वाढत आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी कमी वयाचा कांदा बाजारात आणत असल्याने या शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी पूर्ण वाढ झालेल्या कांद्याची प्रतवारी करून बाजारात विक्रीस आणावा.
अवश्य वाचा - दारूड्या मुलाने केला वृद्ध वडिलांचा खून
महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश राजस्थान, ओरिसा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातील कांदा येण्यास सुरवात झाली आहे. कांदा बाहेरच्या राज्यात पाठविताना जर तो पूर्ण वाढ झालेला असेल तर तो प्रवासात टिकतो. अशा कांद्याला इतर राज्यांच्या मानाने चांगला भाव मिळतो.
प्रतवारीनुसार कांद्याचे क्विंटलचे भाव
क्रमांक एक : 12 हजार ते 9 हजार 600, दोन : साडेनऊ हजार ते पाच हजार 600, तीन : पाच हजार 500 ते दोन हजार 600
जोड कांदा : दोन हजार 500 ते 500
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.