Chandoli Tourism : चांदोली पर्यटन विकासाच्या पोकळ गप्पा; निधी आणण्यात अपयशी ठरले सगळेच मंत्री

नेते आणि अधिकारी सगळे आले, त्यांनी घोषणा केल्या, आराखड्यांची जंत्री बनली, मात्र चांदोलीचा विकास काही झाला नाही.
Chandoli Tourism
Chandoli Tourismesakal
Updated on
Summary

चांदोली जंगलाच्या कोअर झोनमध्ये झोळंबीचे पठार आहे. तेथे शेकडो प्रकारची विविधरंगी फुले येतात. तो ताटवा लक्षवेधी असतो.

सांगली : चांदोली परिसरात पर्यटन विकास हा आमचा प्राधान्याचा विषय असेल. त्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. जयंत पाटील (महाविकास आघाडी सरकार काळातील पालकमंत्री.)

चांदोली पर्यटन (Chandoli Tourism) विकासाचा आम्ही प्राधान्याने विचार करू. आमचे सरकार त्याला निधी देईल. सुरेश खाडे (विद्यमान पालकमंत्री)

चांदोलीचा आराखडा तयार आहे. जिल्हा नियोजनासह विविध मार्गाने निधी आणून काम करू. दीपेंद्रसिंह कुशवाह, विजयकुमार काळम-पाटील (तत्कालीन जिल्हाधिकारी)

नेते आणि अधिकारी सगळे आले, त्यांनी घोषणा केल्या, आराखड्यांची जंत्री बनली, मात्र चांदोलीचा विकास काही झाला नाही. माजी आमदार शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik), विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांनीही प्रयत्नांची शिकस्त केली, पण हा विषय मार्गी लावण्यात त्यांनाही अपयश आले आहे. निधी आणण्यात एकाही मंत्र्याला यश आले नाही.

Chandoli Tourism
कोल्हापूर-सांगली महामार्गाचं चौपदरीकरण अद्याप लटकलेलंच; मंत्री नितीन गडकरींच्या घोषणेचं काय झालं?

चांदोलीचा विकास करून मते मिळत नाहीत, असे त्यांचे मत असावे का, असाच प्रश्‍न यातून उपस्थित होतो. ‘सह्याद्री’च्या कड्याकपारीतील देखणे जंगल म्हणजे चांदोली. पश्‍चिम घाटातील हे घनदाट जंगल; त्यातील बिबटे, अस्वल, गवे, माकड, सरपटणारे अनेक प्राणी, असंख्य पक्षी, वारणा नदीवरील धरण, आजही जंगलात असलेली काही गावे, लोकवस्ती, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे नकाशावर आलेले ठळक स्थान... किती या जमेच्या बाजू! ठरवले असते तर महाराष्ट्रातील एक चांगले पर्यटन केंद्र म्हणून चांदोली जंगलाचा विकास करता आला असता.

म्हैसूर येथील कावेरी धरणावरील वृंदावन गार्डन आणि अलमट्टी धरणावरील गार्डनच्या धर्तीवर येथे मोठी बाग शक्य होती. कारंजे, क्रोकोडाईल पार्क, जंगल सफारीसह अनेक गोष्टींचा त्यात समावेश केला गेला. वारणावती येथील पाटबंधारे विभागाच्या इमारतींचा प्रवासी निवास म्हणून वापर करण्याबाबतही विचार केला गेला. चांदोली धरणात बोटिंगचा विषय पुढे आणण्यात आला. बस खरेदी, जंगल सफारीचे प्रयोगदेखील झाले; मात्र निश्‍चित आराखडा समोर ठेवून निधी आणता आला नाही.

Chandoli Tourism
गोव्याच्या पर्यटन धोरणाचा मालवणला मोठा फटका; पर्यटन पॅकेज सुविधेत बदल, पर्यटकांची संख्याही रोडावली

‘झोळंबीचा सडा’ समोर येतच नाही

चांदोली जंगलाच्या कोअर झोनमध्ये झोळंबीचे पठार आहे. तेथे शेकडो प्रकारची विविधरंगी फुले येतात. तो ताटवा लक्षवेधी असतो, मात्र त्या काळात जंगलप्रवेश बंद असतो. पावसाळ्यात जंगलात जाता येत नाही. ही संपत्ती मग काय कामाची, असा सवाल उपस्थित होतो. झोळंबीला सुरक्षित कुंपण करून ते पर्यटनापुरते खुले करता येईल का, याचा विचार करणे गरजेचे आहे.

पर्यटकांनी का यावं?

चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांनी का यावं, याचं उत्तर देणं गरजेचं आहे. जंगल आहे, नैसर्गिक अधिवास आहे, मात्र पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद घेता यावा, अन्य काही गोष्टी फिरता याव्यात, असं काही नाही. जंगल सफारीसाठी वाहनांची सोय केलीय, काही खासगी रिसॉर्ट झाले आहेत, मात्र प्राण्यांचे दर्शन घडत नाही. त्यासाठी जंगलात दूरपर्यंत पर्यटकांना नेता येईल का, यावरही विचार गरजेचा आहे. जर ‘ताडोबा’त ते शक्य आहे, तर ‘चांदोली’त का नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.