मतदारांना दिलं जातंय आमिष ; तीन दिवसांच्या वेतनासह प्रवास खर्चही

other village people bait from election candidate in belgaum
other village people bait from election candidate in belgaum
Updated on

बेळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी विविध कल्पना लढविल्या जात आहे. त्यातच उद्योग, नोकरी वा रोजंदारीसाठी अन्य राज्यांत तसेच परजिल्ह्यांत गेलेल्या मतदारांना गावात आणण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू झाली आहे.

गावात येऊन मतदान करण्यासाठी त्यांना तीन दिवसांचे वेतन तसेच प्रवास खर्च देण्याची तयारी काही उमेदवारांनी केली आहे. तसेच त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. जिल्ह्यातील ४७७ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रोजंदारी कामगार मोठ्या संख्येने राहतात. उदरनिर्वाहासाठी हे कामगार शेजारील महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांत गेले आहेत. काही कामगार परजिल्ह्यात वास्तव्यास आहेत. या सर्व मतदारांना मतदानादिवशी गावात परत आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांमार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न अनेक उमेदवारांनी सुरु केला आहे.

परराज्यात आणि अन्य गावांत गेलेल्या कामगारांना प्रवास खर्चासह तीन दिवसांच्या वेतनाची रक्कम देण्याची तयारीही काही उमेदवारांनी दर्शविली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर जिल्ह्यातील रामदुर्ग, सौंदत्ती, गोकाक, अथणी, बैलहोंगल, कित्तूर तालुक्‍यांतील २५० हून अधिक गावांतील लोक रोजगाराच्या शोधात अन्य गावी गेले आहेत. शेकडो मजूर परराज्यात कामासाठी गेले आहेत. त्याशिवाय सरकारी वा खासगी नोकरीसाठीही अनेकांनी गाव सोडले आहे. या सर्व मतदारांना गावात आणण्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था होत आहे.

आतापासून खासगी वाहनांचे बुकिंग सुरू आहे. मतदानादिवशी गावी यावे, अशी विनंती उमेदवार या मतदारांना करत आहेत. दहा ते पंधरा जण एकत्रित आल्यास वाहनाची व्यवस्था करण्यात येईल. तर बसद्वारे आल्यास प्रवास खर्चासह तीन दिवसांच्या वेतनाची रक्कम देण्याचे आमिष दाखवले जात आहे. 

लोकशाहीला मारक

मतदारांना आणण्यासाठी आमिष दाखवणे हा प्रकार लोकशाहीला आणि निवडणूक व्यवस्थेला मारक आहे. मतदारांनी स्वयंप्रेरणेने गावी परतून मतदानाचा हक्क बजावावा. पैसा किंवा अन्य सुविधा आणि आमिषाला ब  न पडता पवित्र मतदानाचा हक्क बजावावा. तरच मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहे, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.