सांगोला : मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मदत केल्याचा रोष धरून मुलीच्या वडिलांसह काहीजणांनी पत्रकारास शिवीगाळ व दमदाटी करत काठी व एसटीपी पाइपने जबर मारहाण केल्याची घटना महूद (ता. सांगोला) येथे रविवारी (ता. १५) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.