पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी सुमारे तीन लाखाहून अधिक भाविकांचे पंढरीत आगमन झाल्याने अवघी पंढरी भक्तीमय झाली आहे. कार्तिकी दशमी दिवशी सोमवारी पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी लाखो भाविकांनी भल्यापहाटेपासून चंद्रभागा तीरावर गर्दी केली होती. आज श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती. तर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंधरा तासांचा अवधी लागत होता.