पलूस नगरपालिका वार्तापत्र : निवडणुकीची चर्चा; वातावरण शांतच !

Palus Municipal Newsletter: Election Discussion; The atmosphere is calm!
Palus Municipal Newsletter: Election Discussion; The atmosphere is calm!
Updated on

पलूस : पलूस नगरपालिका निवडणूक सात महिण्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, पालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण शांतच आहे. पालिका निवडणुकीची रंगतदार चर्चा सुरू असली तरी कोणत्याही राजकीय घडामोडी पहायला मिळत नाहीत. 

पलूस शहर हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायत निवडणूक पलूस मध्ये मोठ्या ईर्षेने लढवल्या जायच्या. प्रत्येक पक्षातील, प्रत्येक गटातील नेता, कार्यकर्ता निवडणुकीत हिरहिरीने भाग घेतो. मात्र, त्याच ईर्षेने, त्याच तडफेने निवडून आलेवर कोणी ग्रामपंचायतीमध्ये काम करताना दिसत नाही. तीच परिस्थिती नूतन नगरपालिकेत पहायला मिळते. 


पलूस पालिकेची 2016 मध्ये स्थापना झाल्यानंतर पहिलीच निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आणि गटाने ईर्षेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी, शिवसेना यांनी आपली ताकद अजमावून घेण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. सहाजिकच स्व. आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने पलूस पालिकेत एकहाती सत्ता मिळवली. पालिकेवर पहिला झेंडा कॉंग्रेसचा फडकला. 


नगराध्यक्ष पदावरही कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आला. डॉ. पतंगराव कदम यांच्या सारखा भक्कम नेता असल्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांना काम करण्याची मोठी संधी मिळाली. दुर्दैवाने डॉ. पतंगराव कदम यांचे आकस्मिक निधन झाले. तरीही त्यांचे चिरंजीव व राज्याचे सहकार व कृषी राज्य मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सातत्याने पालिका कारभारात लक्ष दिले. योग्य त्या सूचना पदाधिकारी आणि नगरसेवकांना दिल्या. सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. कदम यांनी दिले. 


मात्र, तरीही पालिकेच्या माध्यमातून सत्ताधारी पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी किती विकासकामे केली. किती प्रश्न सोडवले. कारभारासाठी कोणत्या नगरसेवकाने किती वेळ दिला, याचे मोजमाप प्रत्यक्ष कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी करण्याची गरज आहे. दुर्दैवाने नगराध्यक्ष आजारी असल्यामुळे ते वेळ देऊ शकत नाहीत. डॉ. पतंगराव कदम यांनी पलूस शहराच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर भूमिका घेतली. त्यानंतर डॉ. विश्वजित कदम हेही शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. पलूस शहरासाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. 


सध्यातरी नेहमीप्रमाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये राजकीय चर्चा रंगत आहे. मात्र, प्रत्यक्षात घडामोडी घडताना दिसत नाहीत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते बापूसाहेब येसुगडे यांच्या पश्‍चात पलूस पालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे ईतर बाकीचे पक्ष, नेते, कार्यकर्ते कोणते राजकीय डावपेच टाकतात. याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


ईच्छुकांचे लक्ष प्रभाग रचना व आरक्षणाकडे 
पलूस पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभागरचना होऊन, प्रत्येक प्रभागातून एकच नगरसेवक निवडणून द्यायचा आहे. त्यामुळे त्याठिकाणी आरक्षण निघेपर्यंत ईच्छुकांना शांतच रहावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आहे ते नवीन प्रभाग रचना, आरक्षण सोडतीकडे... 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.