पंढरपूरचे बेदाणे उत्पादक खूष, का ते वाचा....

पंढरपूरचे बेदाणे उत्पादक खूष, का ते वाचा....
Updated on

पंढरपूर : कांद्याच्या दरानंतर आता बेदाण्याच्या दराने काही प्रमाणात उसळी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून 100 ते 150 रुपयांच्या आसपास घोटाळणारा हा दर आता 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. येथील बाजार समितीमध्ये झालेल्या बेदाणे सौदेबाजारात उच्चांकी प्रतिकिलो 221 रुपयांचा भाव शेतकऱ्याला मिळाला. बेदाण्याच्या वाढत्या दरामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 


काही दिवसानंतर पुन्हा बेदाण्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून 100 ते 150 रुपयांपर्यंत असणारे बेदाण्याचे दर आता 200 रुपयांच्या पुढे गेले आहेत. येथील बाजार समितीमध्ये बेदाणे सौदेबाजारात 49 गाड्यांची आवक झाली होती. यामध्ये बावी (ता. माढा) येथील शेतकरी दत्तात्रय वामन मोरे यांच्या बेदाण्याला सर्वाधिक प्रतिकिलो 221 रुपयांचा भाव मिळाला. बेदाणा आडते सोमनाथ डोंबे यांच्या दुकानात खर्डी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी उमेश प्रभाकर परिचारक यांच्या बेदाण्यालाही प्रतिकिलो 202 रुपयांचा भाव मिळाला, यामुळे बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीत मोठी वाढ झाल्याचे उपसभापती विवेक कचरे यांनी सांगितले. 

दर वाढल्याने आवक वाढली
पंढरपूर बाजार समितीमध्ये झालेल्या बेदाणा सौदेबाजारात बेदाण्याचे दर वाढले आहेत. बावी येथील शेतकरी दत्तात्रय मोरे यांच्या बेदाण्याला सर्वाधिक प्रतिकिलो 221 रुपये, तर खर्डी येथील शेतकरी उमेश प्रभाकर परिचारक यांच्या बेदाण्याला 202 रुपयांचा भाव मिळाला. दर वाढल्याने आवकही वाढली आहे. 
- दिलीप घाडगे, सभापती, बाजार समिती  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.