Adhik Maas 2023 : अधिक महिन्यात विठ्ठलचरणी भरघोस दान

मंदिर समितीस तब्बल सव्वासात कोटी रुपयांचे उत्पन्न
Pandharpur Vitthal Temple Donation
Pandharpur Vitthal Temple Donation Sakal
Updated on

पंढरपूर : अधिक महिन्यात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस तब्बल सात कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळाले. तीन वर्षापूर्वी २०१८ मध्ये अधिक महिन्यात दोन कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपये उत्पन्न मिळाले होते.

त्या तुलनेत यंदाच्या अधिक महिन्यात तब्बल चार कोटी ८६ लाख ९१ हजार ११३ रुपये जास्त उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

अधिक महिन्यात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यंदादेखील अधिक महिन्यात ६ लाख ३९ हजार ९१७ भाविकांनी पदस्पर्श तर सुमारे पाच लाख भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला.

लाखो भाविकांनी गर्दीमुळे चंद्रभागेवर स्नान करून दर्शन रांगेत न थांबता विठुरायाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानले. अधिक महिन्यात सोने-चांदीच्या वस्तू विठुरायास भाविकांकडून मोठ्या संख्येने अर्पण केल्या जातात.

यंदा २४ लाख ९८ हजार ८९० रुपये किमतीचे सोने आणि ८ लाख १८ हजार ८५९ रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू भाविकांकडून अर्पण करण्यात आल्या. या देणगीतून भाविकांना अत्याधुनिक आणि चांगल्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

तपशील -रक्कम

  • श्री विठ्ठलाच्या पायावरील -५४ लाख ८२ हजार ४२०

  • श्री रुक्मिणी मातेच्या पायावरील- १९ लाख १२ हजार ९३३

  • नित्यपूजा- पाच लाख दोन हजार

  • श्री विठ्ठल विधी उपचार -तीन लाख ४० हजार

  • अन्नछत्र देणगी -७३ हजार ६१२

  • देणगी -एक कोटी ४६ लाख २४ हजार ४६१

  • लाडू प्रसाद -८७ लाख ७३ हजार ३००

  • फोटोविक्री -एक लाख २६ हजार ८२५

  • वेदांता भक्तनिवास -पाच लाख ५३ हजार ५६

  • व्हिडिओकॉन भक्तनिवास -पाच लाख ४५ हजार ३२८

  • श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास-४२ लाख ३९ हजार १७२

  • महानैवेद्य सहभाग योजना- एक लाख ७५ हजार

  • गोशाळा कायम ठेव- एक लाख १८ हजार

  • मनीऑर्डर -१७ हजार ५३५

  • तुळशीपूजा- आठ लाख २१ हजार १००

  • साडी -दोन लाख ५६ हजार ५९५

  • दूधविक्री- ३१ हजार ७५

  • मोबाईल लॉकर -चार लाख ३० हजार ८८५

  • जमीनखंड- ३७ हजार ३००

  • गोमूत्रविक्री- पाच हजार २८१,

  • हुंडीपेटी -१ कोटी ४५ लाख १८ हजार २५

  • परिवार देवता -८० लाख ५२ हजार ४६६

  • दैनंदिनी -दोन हजार १००

  • इतर -दोन लाख ९३ हजार ६६०

  • पावती -एक लाख ५५ हजार ३७

  • गाळाभाडे -दोन लाख ८१ जार ५६१

  • फॉर्म शुल्क- एक लाख १९ हजार १४०

  • ऑनलाइन नित्यपूजा -आठ लाख ९५ हजार एक

  • ऑनलाइन तुळशीअर्चन पूजा- ४६ हजार २००

  • ऑनलाइन पाद्यपूजा- २६ हजार ४४०

  • ऑनलाइन देणगी- चार लाख ५६ हजार ७२७

  • ऑनलाइन भक्तनिवास- ४७ लाख १२ हजार ४५३

  • सोने भेट -२४ लाख ९८ हजार ८९०

  • चांदी भेट- आठ लाख १८ हजार ८५९

  • एकूण जमा -७ कोटी १९ लाख ४३ हजार ३७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.