विसापूर : हाकेच्या अंतरावर असणारी जवळची गावे कोरोनाची हॉटस्पॉट (corona hotspot) बनत असताना तासगाव तालुक्यातील पानमळेवाडीने कोरोनाला वेशीवर रोखले आहे. गावकऱ्यांची एकजूट, दक्षता समितीची कारवाई आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळे गावात अद्याप एकही कोरोनाबाधित (no covid-19 patients) नाही. कोरोनाला रोखण्यासाठी स्वयंशिस्तीचे धडे गिरवणारे गावकरीच खरे कोरोना योद्धे ठरले आहेत.
सांगली - विटा महामार्गावर (national highway sangli vita) तासगावपासून दहा किलोमीटरवर पानमळेवाडी (panmalewadi) आहे. लोकसंख्या जेमतेम असली तरी कोरोना सारख्या महामारीला रोखण्यासाठी गावकऱ्यांची धडपड मात्र कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे या दोन महिन्यात गावातील बाहेर कोणी गेले नाही. बाहेरचा गावात कोण आला नाही. बाहेरची कोणी व्यक्ती आलीच तर त्याला तातडीने जिल्हा परिषद (zilha parishad school) शाळेत क्वारंटाईन (quarantine) केले जाते.
गावातील ७० टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे ही एक जमेची बाजू. त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांमार्फत (aasha workers) घरोघरी सर्वेक्षण आणि माहिती संकलन केली जात आहे. लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करण्यात येतात. त्याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी आरोग्य शिक्षण देण्यात येते. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, दक्षता समिती सदस्य, काही तरुण स्वयंसेवकांनी प्रत्येक घरी भेट दिली आहे. प्रत्येक चौकात एक तास थांबून तरूण नियोजन करीत आहेत.
स्वस्त धान्य घेण्यासाठी दहा जणांनाच परवानगी दिली जाते. सकाळी पाच आणि सायंकाळी पाच लोकांना स्वस्त धान्य दिले जाते. त्यामुळे गर्दी होत नाही. लॉकडाऊन (lcokdown) होण्यापूर्वी किराणा माल स्वयंसेवकांमार्फत घरोघरी पोहोच केला जातो. पर्यायाने संसर्ग कमी झाला. त्यामुळेच गाव कोरोना मुक्त आहे. सरपंच श्रीमती सुशीला धाबुगडे, उपसरपंच गणेश चव्हाण, ग्रामसेविका सौ. ज्योती भिसे, पोलीस पाटील विशाल भोसले, तलाठी सौ.जयश्री रेळेकर, राजेंद्र धाबुगडे, सुमित भोसले, रोहित भोसले, समीर मुलाणी त्याचबरोबर मोरया प्रतिष्ठान, शिवगर्जना मंडळाचे कार्यकर्ते कोरोना मुक्तीसाठी झटत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.