पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा अखेर मुहूर्त बारगळला; संघटना आक्रमक

teachers
teachers
Updated on

कामेरी (सांगली) : राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित ,प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा अखेर मुहूर्त बारगळला असून, खाजगी शिक्षण संस्था चालक हा भरतीचा अधिकार आपणाकडे घेण्याच्या पवित्र्यात आहेत. या रखडलेल्या भरतीमुळे उमेदवार त्रस्त झाले आहेत.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शैक्षणीक विभागाच्या भरतीला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विशेष प्राधान्य दिले होते. त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच उमेदवाराच्या मुलाखत याद्या जाहीर होणार होत्या. त्यानुसार तीन हजार पदे भरली जाणार होती. यापूर्वी शासनाने सहा हजार पदे भरली आहेत. मात्र हा प्रश्न पुन्हा रखडला गेला. शैक्षणिक क्षेत्राच्या पहिल्याच सत्रात राज्यातील सर्व शाळांना शिक्षक मिळालेच नाहीत.

teachers
गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा; संभाजीराजे भडकले

काही शाळेत तर इंग्रजी, गणित या विषयाला शिक्षक नाहीत. मराठी विषयाचे विषय शिक्षक इंग्रजी , गणित विषय शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शैक्षणिक संस्था चालकांनी शाळा टिकवण्यासाठी काही विषयाचे शिक्षक खाजगी तत्त्वावर घेऊन त्यांना पगार देत आहेत. मात्र हा पगार देणे आता संस्था चालकांना परवडत नाही . शासनाने शैक्षणिक संस्थातील नोकर भरती पारदर्शक व्हावी. या हेतूने पवित्र पोर्टल निर्माण केले या पवित्र पोर्टला ही संस्थाचालकांनी या रिक्त जागा शासनाच्या माध्यमातून भरणेस इच्छेने परवानगी दिली आहे. मात्र गेली चार वर्ष शासनाच्या या रखडलेल्या भरतीमुळे संस्थाचालकांनी ही भरती आता संस्था स्तरावरच करण्यास परवानगी द्यावी, असा पवित्रा घेतला आहे. शासनाच्या या दिरंगाईमुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेल्या उमेदवारांची मोठी निराशा होऊ लागली आहे. तरी शासनाने तातडीने या तीन हजार जागा भराव्यात अशी मागणी उमेदवार यांनी केली आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या भरतीला दिरंगाई होत असून, यामुळे उमेदवारांची मोठी निराशा होऊ लागली आहे. डीएड, बीएड पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांची संख्या आता दहा लाखाच्या घरात गेली आहे. शासनाने लवकरात लवकर मुलाखतीच्या तारखा जाहीर करून भरती करावी अन्यथा आम्ही संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू.

अॅड परमेश्वर इंगोले पाटील, राज्यअध्यक्ष रयत संकल्प डी.एड बी.एड संघटना महाराष्ट्र राज्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.