Sangli : पेठ-सांगली रस्त्याची दुरवस्था ‘व्हायरल!’

सोशल मीडियावर ‘मिम्स’ना नेटकऱ्यांकडूनही प्रतिसाद
Sangli
Sangli sakal
Updated on

इस्लामपूर : दुरुस्तीच्या कित्येक फेऱ्या होऊन सुद्धा दुरवस्थेतच असलेला पेठ-सांगली रस्ता आता सोशल मीडियासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या रस्त्याची टर उडवणारे अनेक ‘मिम्स’ सध्या तुफान ‘व्हायरल’ होत आहेत. नेटकऱ्यांकडून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

पेठ-सांगली हा राज्य महामार्ग दुरवस्थेमुळे सतत चर्चेत राहिला आहे. पेठ, इस्लामपूर, आष्टा, सांगली अशा सर्व टप्प्यांत रस्त्याची अवस्था दयनीय आहे. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाला जोडणारा आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाणारा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर सर्वच प्रकारच्या वाहनांची सातत्याने वर्दळ असते. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यांवर वाहन चालवणे म्हणजे चालकांसाठी कसरतीचा विषय ठरला आहे. रस्त्याच्या अशा दुरवस्थेमुळे या रस्त्यावर कित्येक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत, शिवाय अनेकजण जायबंदी झाले आहेत. वारंवार दुरुस्ती होऊन सुद्धा पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच अवस्था आहे.

कित्येक वर्षे ही स्थिती राहिल्याने आता हा रस्ता सोशल मीडियावर चांगलाच ‘ट्रोल’ होत आहे. सांगली रस्त्यावरून जाणाऱ्या बसमध्ये पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांची बोटीत बसल्यासारखी होणारी अवस्था एकाने मोबाईलमध्ये बंदिस्त केली. त्याला ‘मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ गाण्याची जोड दिली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केलाय. रस्त्याची अचूक अवस्था दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ‘व्हायरल’ झाला. त्यानंतर अनेक ‘मिम्स’देखील या रस्त्यावर रचले गेले.

एखाद्या जखमी कलाकाराच्या तोंडी ‘उगाच सांगलीला गेलो,’ असं वाक्य देऊन झालेले ‘मिम्स’ चांगलेच गाजले. अलीकडेच आलेल्या ‘मिम्स’मध्ये शोले चित्रपटातील प्रसंगाचा वापर केला आहे. जखमी अवस्थेतील अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांच्या मांडीवर आहे. धर्मेंद्र त्यांना विचारतात ‘कुठं पडलास’?, त्यावर बच्चन म्हणतात ‘सांगली-आष्टा रोडवर’ हा देखील तुफान ‘व्हायरल’ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.