पोलिसांची गस्त कोणीकडे? 

Police patrols fail
Police patrols fail
Updated on

नगर : शहर व उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या, घरफोडी आणि रस्तालुटीचे प्रकार वाढले आहेत. त्यात धूमस्टाईलने दागिने लांबविण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. चोराच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. चोरांपुढे पोलिस यंत्रणा हतबल झाली आहे. पोलिसांची रात्रीची गस्त नेमकी कोठे असते, असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे. 

नगर शहर व उपनगरांतील अपार्टमेंटमध्ये घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी नगर-मनमाड रस्त्यावरील सुमारे आठ दुकाने चोरांनी फोडली. त्याच रस्त्याने पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या वाहनांची ये-जा असते. मग ती दुकाने फोडली कशी, असा प्रश्‍न आहे. त्यानंतर चोरांनी बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड आदी परिसरात घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविला. उपनगरांमध्ये ढवणवस्ती, गावडे मळा, निर्मलनगर आदी परिसरात चोरांनी चांगलाच हात साफ केला. मात्र, अद्यापि पोलिसांना चोरांचा शोध लागला नाही. 

धूमस्टाईल चोर झाले शिरजोर 
शहरामध्ये धूमस्टाईल चोर पोलिसांना शिरजोर झाले आहेत. आतापर्यंत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याचे अनेक गुन्हे दाखल होऊनही पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात यश आले नाही. दोन डिसेंबर रोजी सिव्हिल हडकोजवळ एका महिलेच्या हातातील पर्स हिसकावून चोरांनी सुमारे तीस लाख दोन हजार रुपयांचे दागिने लांबविले. त्या दिवशी निर्मलनगर येथील भगवान बाबा चौकात एका महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने हिसकावले. त्यामुळे पोलिस नेमके करतात काय? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

रस्तालूट नेहमीचीच 
दुचाकीचा व चारचाकीचा अपघात झाला आहे, असे म्हणून शहर व उपनगरामध्ये सामान्य प्रवाशांना लुटणारी टोळीच कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नीलक्रांती चौकात दुचाकीवर दोघांनी एका डॉक्‍टरला अपघात झाल्याचा बनाव करून लुटले. आयुर्वेद कॉर्नर, माळीवाडा बसस्थानक, पत्रकार चौक आदी परिसरात नागरिकांना रस्त्यात अडवून लुटले जाते. पोलिस ठाण्यात केवळ गुन्हा दाखल होत आहेत. तपास मात्र शून्य असल्याचे सूत्रांकडून समजले. 

मोकळे भूखंड तळीरामांचे अड्डे 
शहर परिसरामध्ये असलेल्या बोल्हेगाव, सावेडी, केडगाव उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. आता हे भूखंड तळीरामांचे अड्डे झाले आहेत. शहरातील अधिकृत मद्यविक्री दुकानातून मद्य घेतल्यानंतर रात्री आठ ते दहाच्या दरम्यान तरुणांच्या टोळ्या भूखंडामध्ये धिंगाणा घालतात. याकडे पोलिस सोईस्कर दुर्लक्ष करतात. यातून काही गैरप्रकार झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

गस्तीचे प्रमाण वाढविण्यात येणार

शहरातील घरफोड्या, चोरी आणि रस्तालुटीला प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपयोजना केल्या आहेत. आतापर्यंत दोन टोळ्या गजाआड केल्या असून, उपनगरामध्ये पोलिस गस्तीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. - संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.