अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या पोलिसाला तीन वर्षे शिक्षा; लैंगिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याचीही दिली होती धमकी

संबंधित अल्पवयीन मुलगा हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.
Islampur Police Station
Islampur Police Stationesakal
Updated on
Summary

हणमंत देवकर याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २१ हजारांचा दंड सुनावला. सरकार पक्षातर्फे अठरा साक्षीदार तपासण्यात आले.

इस्लामपूर : अल्पवयीन मुलास (Minor Girl) अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडून, त्याच्याकडून खंडणी वसूल करून, तसेच लैंगिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या पोलिस हणमंत देवकर याला येथील न्यायालयाने (Court) तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यासमवेत हा प्रकार घडला होता.

Islampur Police Station
'लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत'; इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा मोठा दावा

पीडित मुलाने नोव्हेंबर २०२१ मध्ये इस्लामपूर पोलिस ठाण्यात (Islampur Police Station) याबाबतची फिर्याद दिली होती. याबाबत मिळालेली माहिती अशी, की संबंधित अल्पवयीन मुलगा हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. शिक्षणासाठी तो इस्लामपूर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होता. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री एका मैत्रिणीला भेटून कॉलेजजवळ आला होता. त्याला दोघा पोलिसांनी अडवले आणि चौकशी केली. त्या मुलाने मैत्रिणीला भेटून आल्याचे स्पष्ट सांगितले.

त्यावेळी दोघांपैकी एका पोलिसाने त्या मुलाचा मोबाईल नंबर घेतला आणि ते निघून गेले. दोन दिवसांनी २९ ऑक्टोबरला हणमंत देवकर या पोलिसाने त्या मुलाला भेटायला बोलावले. मैत्रिणीसमवेत असलेल्या प्रेमसंबंधावरून धमकावले आणि पैशांची मागणी केली. त्या मुलाने घाबरून जाऊन मित्रांकडून पैसे घेतले आणि पोलिसाला दिले. मात्र देवकर याचे समाधान झाले नाही. त्याने मैत्रिणीचा नंबर मागितला आणि, ‘आम्हाला दोघांना जोडून दे,’ असे सांगितले. हा मुलगा घाबरला होता. त्यामुळे त्याने नंबर देण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र याने मग ‘तुला माझ्याशी संबंध ठेवावे लागतील,’ असे धमकावले.

Islampur Police Station
'राज्यात तीन महिन्यांनंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल'; शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचा मोठा दावा

तो मुलगा ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता, तेथे त्याला घेऊन गेला आणि त्याच्यावर जबरदस्ती केली. तसेच त्या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रिकरणही केले. काही दिवसांनी, म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी देवकर याने परत त्या मुलाला भेटायला बोलवले. पुन्हा संबंधाची मागणी केली आणि नाही दिल्यास मोबाईलमधील व्हिडिओ दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या मुलाने वेळ मारून नेत ‘संध्याकाळी भेटू,’ असे सांगत तिथून काढता पाय घेतला आणि रूमवर जाऊन मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने मित्रांसमवेत जाऊन इस्लामपूर पोलिस ठाण्यात घडलेल्या प्रकारची तक्रार दाखल केली.

इस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश हेमंत पांचोली यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. त्यांनी हणमंत देवकर याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २१ हजारांचा दंड सुनावला. सरकार पक्षातर्फे अठरा साक्षीदार तपासण्यात आले. तत्कालीन पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तपास केला. या प्रक्रियेत हवालदार संदीप शेटे व श्री. मोरे यांचे सहकार्य मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com