किल्लेमच्छिंद्रगड : धार्मिक, ऐतिहासिक परंपरा, वारसा असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड गावाचे विभाजन करून नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा राजकीयदृष्ट्या स्ट्राँग असलेल्या "बी" कंपनीचा मनसुबा असल्याची चर्चा समोर येवु लागली आहे. कऱ्हाड तालुक्यातील जुळेवाडी गावास लागून असलेल्या किल्लेमच्छिंद्रगड गावचे नागरिक राहत असलेला भाग, कृष्णा कारखान्यास लागून असलेला पण किल्लेमच्छिंद्रगड ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या व्यापारी वसहतीचा पाच नंबर वॉर्ड आणि विवादित कृष्णा गृह निर्माण सोसायटीचा भाग मिळून नवीन औद्योगिक नगरी स्थापन करण्याचा डाव असून यामागे किल्लेमच्छिंद्रगडचे ऐतिहासिक महत्व कमी करण्याचा आणि महसुली उत्पन्ना कमी करण्याचा दृष्ट हेतूने प्रयत्न सुरू असल्याचे जाणवते.