प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली यांच्यावतीने कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव दिला आहे.
सांगली : प्रदूषण नियंत्रण आणि नियंत्रण मंडळाने इस्लामपूर येथील राजारामबापू साखर कारखान्याला (Rajarambapu Sugar Factory) नोटीस बजावली आहे. कारखान्यांच्या डिस्टिलरी युनिटमधून प्रदूषित पाणी नाल्यामधून कृष्णा नदीमध्ये सोडले होते. याची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अधिकारी जे. एस. हजारे यांनी नोटीस बजावली आहे. सात दिवसांत उत्तर द्या, अन्यथा कारवाईचा इशारा प्रदूषण मंडळाने दिला आहे.