Sangli News : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तीस सप्टेंबरपर्यंत स्थगिती

जिल्ह्यातील चार संस्थांचा समावेश ः पावसाळ्यानंतर कार्यक्रम होणार सुरू
postponement of cooperative societies elections till 30th September sangli
postponement of cooperative societies elections till 30th September sangliSakal
Updated on

Sangli News : ऐन पावसाळ्यात होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तीस सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. राज्यातील २४ हजार ७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून, पैकी ८३०५ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया आता पावसाळा संपेपर्यंत स्थगित राहणार आहे.

यामध्ये जिल्ह्यातील ४ संस्थांचा समावेश असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले. पावसाळ्यातील निवडणुका स्थगित किंवा पुढे ढकलल्यामुळे किमान ५० संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार १२ जूनअखेर राज्यातील १४ जिल्ह्यांत गतवर्षीच्या सरासरी १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. पाच जिल्ह्यांत सरासरीच्या ७० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

postponement of cooperative societies elections till 30th September sangli
Sangli Politics : 'मला टोकाला जायला लावू नका..'; जयंत पाटील समर्थकांची रील्स, खासदार अन् आमदार कदमांना इशारा

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड व शेतीच्या अन्य कामांत व्यस्त आहेत. अनेक संस्थांमध्ये शेतकरी सभासद असल्यामुळे ते सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका स्थगित केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे राज्यातील निवडणूक कार्यक्रमांना ‘जैसे थे’ आदेश मिळाले होते. त्यामुळे ३० मेपर्यंत निवडणुकांसाठी ज्या ठिकाणी प्रक्रिया थांबवलेली होती, त्याच ठिकाणी थांबली. ४ जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. त्यानंतर पुन्हा सात जूनला निवडणुका ज्या ठिकाणी स्थगित होत्या, तेथून पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.

५० संस्थांच्या निवडणुकाही जाणार पुढे

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यातील वसंतदादा साखर कारखाना, कोकळे येथील सहकारी साखर कारखाना (साईट-सोनी) या दोन कारखान्यांसह ‘ब’ वर्गातील हमाल पंचायत, निंबवडे सोसायटी आणि ‘क’ वर्गातील ४१ हून अधिक पतसंस्था आणि विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार होता. या संस्थांच्या निवडणुका याआधीही काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्य पातळीवरच निवडणूक स्थगितीचा निर्णय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चार निवडणुकांच्या कार्यक्रमांनाही स्थगिती दिली आहे. पावसाळी हंगाम संपल्यानंतर साधारण तीस सप्टेंबरनंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार पुन्हा कार्यक्रम नियमित होतील.

- मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक, सहकार सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.