खानापूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी बँकांची कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय उभारले. मात्र सततच्या आर्थिक नुकसानीने हा व्यवसाय डबघाईला येऊ लागला आहे.
विटा : कोंबड्यांना खाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या मक्यात वाढ झाली आहे. भांडवलाअभावी अंड्यावरील कोंबड्याची पिल्ले पोल्ट्रीधारकांनी खरेदी केली नाहीत. परिणामी, दररोजचे तीन लाख अंडी उत्पादन घटले आहे. भांडवलाअभावी खानापूर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business) धोक्यात आल्याचे पोल्ट्रीधारक सांगत आहेत.