आयुष्यातील पहिली कमाई ज्ञानमंदिरांसाठी देत ठेवला आदर्श

प्राजक्ताचे विद्या मंदिर सेनापती कापशी येथे चौथीपर्यंतचे तर गलगले येथे सातवीपर्यंत शिक्षण घेतले होते
prajkta khot
prajkta khotsakal media
Updated on

नानीबाई चिखली : आयुष्याची पहिली कमाई ही प्रत्येकासाठी खास असते. या कमाईचा आनंद प्रत्येकजण आपआपल्या परीने घेतो. यामध्ये कांहीजण गाडी, इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करतात तर कांहीजण नवीन कपडे खरेदी करतात. परंतु या सर्वांपलीकडे जात आपली पहिली कमाई ज्ञानमंदिरासाठी खर्च करणारे विरळच असतात. त्यापैकीच एक म्हणजे प्राजक्ता खोत होय. तिने आपली पहिली कमाई ज्ञानमंदिरांना देता एक आदर्श वस्तुपाठ सर्वांसमोर ठेवला आहे. यामुळेच तिच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

prajkta khot
हायकोर्टाकडून सेशन्स कोर्टाचा निर्णय रद्द, देशमुख पुन्हा ईडीच्या ताब्यात

येथील प्राथमिक शिक्षक असलेले सुरेश खोत यांची प्राजक्ता ही कन्या. लहानपणापासूनच हुशार असलेल्या प्राजक्ताने शिक्षण घेतानाच मनाशी एक खूणगाठ बांधली होती. ती म्हणजे ज्ञानाबरोबरच संस्काराचे धडे देऊन जीवन समृद्ध करणाऱ्या ज्ञानमंदिरांसाठी आपली पहिली कमाई खर्च करावयाची. त्याचाच भाग म्हणून तिने बारावीपर्यंतचे शिक्षण ज्या ज्या शाळेतून घेतले त्या शाळांना आर्थिक मदतीचा हात दिला.

प्राजक्ताचे विद्या मंदिर सेनापती कापशी येथे चौथीपर्यंतचे तर गलगले येथे सातवीपर्यंत शिक्षण घेतले होते. येथे शिक्षण घेत असतानाच ती शिष्यवृत्तीधारक बनलेली होती. त्यानंतर अर्जुननगर येथील एम.डी. विद्यालयात आठवीचे शिक्षण घेताना तिची कागल येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. नवोदय विद्यालयमध्येच बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पुणे येथे बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. तेथेच तिची कॅम्पसमधून टाटा कन्सल्टींगसाठी निवड झाली.

नोकरी करीत असतानाच तिला मिळालेला पहिला पगार तिने जपून ठेवला होता. गेल्या आठवड्यात सुट्टी घेऊन गावी आल्यानंतर तिने आपला पहिला पगाराचा धनादेश सेनापती कापशी, गलगले तसेच एम.डी. विद्यालय, नवोदय विद्यालयांना आर्थिक मदत दिली. तिच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल डायटच्या प्राध्यापिका आर. एस. जाधव यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे, सुरेश खोत तसेच शिक्षक उपस्थित होते.

prajkta khot
दिल्ली पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

"प्रत्येक विद्यार्थी दातृत्वाच्या बाबतीत सर्वोच्च ठिकाणी असला पाहिजे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना प्रत्येकाने जपायला हवी. याची शिकवण शाळेतून तसेच आई वडीलांकडून मिळत असते. त्याचा योग्य वापर योग्य ठिकाणी झाला पाहिजे."

- प्राजक्ता खोत

"ज्या शाळेने आपल्याला घडविले. त्या शाळेचे आपण कांहीतरी देणे लागतो. यातून उतराई होणे प्रत्येकाचे काम आहे. प्राजक्ताने उदात्त हेतूने केलेली मदत कौतुकास्पद असून तिचा आदर्श इतरांनी घ्यावा."

- डॉ. जी. बी. कमळकर, गटशिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.