Loksabha Election : सीमाभागातील 'या' मतदारसंघात भाजपचा उमेदवार ठरला, काँग्रेसचं काय? लोकसभेसाठी पाचजण इच्छुक

चिक्कोडी लोकसभा कार्यक्षेत्रातील आमदारांची संख्या आता भाजपकडे तीन व काँग्रेसकडे पाच अशी आहे.
Chikkodi LokSabha Election
Chikkodi LokSabha Electionesakal
Updated on
Summary

काँग्रेसकडून पारंपरिक विरोधक प्रकाश हुक्केरी पुन्हा लोकसभेची उमेदवारी घेणार की दुसऱ्याला संधी देणार हे पाहावे लागणार आहे.

चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यात दोन लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघ असून यापूर्वीच काँग्रेस व भाजपने तयारी सुरू केली आहे. चिक्कोडीत विद्यमान खासदारांना उमेदवारी भाजप देणार असल्याची चर्चा असून त्यानुसार त्यांनी विविध कार्यक्रमांतून प्रचार सुरू केला आहे. तर काँग्रेसकडून (Congress) अद्याप खुलेपणाने एकाही नावाची चर्चा नसल्याने सावध पवित्रा असल्याचे दिसून येत आहे.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात (Chikkodi Loksabha Constituency) गेल्या दोन निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार असल्याने चुरशीची निवडणूक झाली होती. २००९ मध्ये भाजपचे रमेश कत्ती यांनी बाजी मारून प्रकाश हुक्केरी (Prakash Hukkeri) यांचा कमी मताधिक्क्याने पराभव केला. कत्ती यांनी या मतदारसंघात पकड बनविली असतानाच २०१४ मध्ये पुन्हा काँग्रेसकडून प्रकाश हुक्केरी व भाजपकडून रमेश कत्ती यांच्यात लढत झाली. यावेळी प्रकाश हुक्केरी यांनी बाजी मारली.

Chikkodi LokSabha Election
मुश्रीफांची राजकीय भूमिका गुलदस्त्यात; महाडिकांच्या नव्या गट्टीने भविष्यातील राजकारण ठरणार अडचणीचे?

२०१९ मध्ये भाजपने उमेदवार बदलून अण्णासाहेब जोल्ले (Annasaheb Jolle) यांना उमेदवारी दिली. येथे काँग्रेसकडून पुन्हा प्रकाश हुक्केरी रिंगणात असतानाही जोल्ले यांनी लाखावर मताधिक्क्याने विजय मिळविला. अलीकडच्या या राजकीय घडामोडीत अनेक बदल झाले आहेत. चिक्कोडी लोकसभा कार्यक्षेत्रातील आमदारांची संख्या आता भाजपकडे तीन व काँग्रेसकडे पाच अशी आहे. त्यामुळे या निवडणुकीत विद्यमान खासदार जोल्ले यांना उमेदवारी मिळाल्यास दुसरे इच्छुक रमेश कत्ती यांना काँग्रेस पायघड्या घालून उमेदवारी देण्याबाबत सावध विचार करत आहे.

Chikkodi LokSabha Election
'8 एप्रिल 1627 हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी'; ज्येष्ठ इतिहास संशोधकाचं स्पष्ट मत

त्यामुळे उमेदवार जाहीर करण्यामध्ये काँग्रेस सध्या मागे आहे. काही मतदारसंघात संभाव्य उमेदवारांनी प्रचार सुरू केला असला तरी चिक्कोडीत अद्याप त्यावर अंतर्गत खल सुरू आहे. चिक्कोडी लोकसभेसाठी काँग्रेसकडून पाच इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. भाजपच्या खासदारांनी सध्या आठही विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांतून प्रचारास गती दिली आहे. तर काँग्रेसकडून पारंपरिक विरोधक प्रकाश हुक्केरी पुन्हा लोकसभेची उमेदवारी घेणार की दुसऱ्याला संधी देणार हे पाहावे लागणार आहे. काँग्रेसकडून दिग्गज उमेदवार रिंगणात आल्यास ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

Chikkodi LokSabha Election
डॉ. आंबेडकरांच्या नावाची कमान पाडल्याप्रकरणी बाजू मांडण्यास सरपंच-सदस्यांना हवीये मुदत; सुनावणीवर आंबेडकरी समाजाचा बहिष्कार

इतर सत्ता केंद्रांवरही परिणाम

जिल्ह्यात बऱ्याच मतदारसंघात समेटाचे राजकारण होत असल्याचे आजपर्यंतच्या अनेक निवडणुकांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावेळी पक्षापेक्षाही अंतर्गत समेटातून निकालाची परंपरा कायम राहणार की काय, अशी स्थिती सध्या आहे. जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या जिल्हा बॅंकेतही आतापासून राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. रमेश कत्ती हे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आहेत. ते भाजपकडून उमेदवारी मागण्याची शक्यता आहे. भाजपची उमेदवारी न मिळाल्यास त्यांना काँग्रेस नेते गळ घालून उमेदवारी देऊ शकतात. त्यामुळे अशा प्रसंगात जिल्हा बॅंकेची गणिते बदलणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.