Sangli Crime : माझ्या गँगमध्ये सामील का होत नाहीस? रागातून मित्रानंच काढला मित्राचा काटा, गुंड पुजारीचा खून

नवीन बहे नाका परिसरातील चौकात मल्हार बार समोर हा प्रकार घडला.
Islapur Police Prakash Pujari
Islapur Police Prakash Pujariesakal
Updated on
Summary

आरोपींच्या शोधासाठी परिसरात पथके रवाना झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

इस्लामपूर (सांगली) : माझ्या गँगमध्ये सहभागी का होत नाहीस असं म्हणत शहरातील सराईत गुंड प्रकाश महादेव पुजारी (वय २४) याचा मंगळवारी मध्यरात्री डोक्यात धारधार शस्त्राने वार करून त्याच्या मित्रांनीच खून केला. या प्रकारानंतर एकच खळबळ माजली आहे.

नवीन बहे नाका परिसरातील चौकात मल्हार बार समोर हा प्रकार घडला. खुनानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं आहे. मृत प्रकाशचे (Prakash Mahadev Pujari) गुन्हेगारी क्षेत्रातील सहकारी गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी एक साथीदार यांनी चॉपर व दगड विटांनी हल्ला चढवला.

Islapur Police Prakash Pujari
Kolhapur Bandh : छ. शिवाजी महाराजांवर वादग्रस्त स्टेटस्; कोल्हापुरात शुकशुकाट, शहरात मोठा पोलिस बंदोबस्त

प्रकाश पुजारी हा संशयित गजराज पाटील व त्याचे साथीदार हे त्याचे गँगमध्ये सामिल होत नाही म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाशवर खुन्नस ठेवून होते. या कारणाचा राग मनात धरून त्यांच्यात सतत धुसफूस होत होती. काल रात्री प्रकाश त्याच्या मित्रांच्यासोबत बारमध्ये दारू पीत बसला होता. तेथे येवून गजराज पाटील याने प्रकाश बरोबर वाद केला. त्यानंतर गजराजने प्रकाशच्या डोक्यावर हल्ला चढवला.

Islapur Police Prakash Pujari
Kolhapur Bandh : 'ती' बातमी वाऱ्यासारखी आली आणि प्रचंड तणाव निर्माण झाला; रस्त्यावर सामसूम, दुकानं पटापट बंद

तर सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी साथीदार यांनी मिळून लाथाबुक्यानी आणि दगड व विटाने मारहाण करून त्याचा खून केला. याबाबतची फिर्याद रोहन रविंद्र इच्चुर याने इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

Islapur Police Prakash Pujari
Kolhapur : औरंगजेबच्या समर्थनार्थ पोस्ट; कोल्हापुरात तणाव, 'जय श्रीराम'चा नारा देत कडक कारवाईची मागणी

गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी एक साथीदार या चार जणांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री इस्लापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी परिसरात पथके रवाना झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.