Sangli : अंधश्रद्धांना छेद देण्यासाठी पूजाचं धाडस; सूर्यग्रहण पाहिलं अन् दिला गोंडस बाळाला जन्म

ग्रहणकाळात पूजा जाधव यांनी सौर चष्म्यातून थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळे भिडवले होते.
Pooja Jadhav
Pooja Jadhavesakal
Updated on
Summary

हा उपक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व शंभूराजे प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला.

नवेखेड : अंधश्रद्धेला छेद देऊन ग्रहणाशी डोळे भिडवणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकी’ने गोंडस अशा सदृढ कन्यारत्नाला जन्म दिला. मुलीचे नुकतेच राजनंदिनी असे नामकरण करण्यात आले आहे.

अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी नवेखेड येथील ‘सावित्रीच्या लेकी’ने परंपरेशी विद्रोह करून सूर्यग्रहणाशी डोळे भिडवून अंधश्रद्धेला छेद दिला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नवेखेड येथील पूजा ऋषिराज जाधव, ऋषिराज मोहन जाधव या उच्चशिक्षित दाम्पत्याने पुढाकार घेऊन समाजातील ग्रहण न पाहण्याच्या अनिष्ट प्रथेला मूठमाती दिली होती आणि समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.

Pooja Jadhav
Sambhajinagar : लग्नास विरोध झाल्यामुळं दोघं पळून गेले अन् आळंदीत लग्न केलं; पण पोलिसांनी 'त्यांना' पकडलंच!

ग्रहणकाळात पूजा जाधव यांनी सौर चष्म्यातून थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळे भिडवले होते. विशेष म्हणजे त्यांनी सर्व कुटुंबीयांचे सहकार्य मिळाले. पूजा जाधव यांच्या आजीसासू शांताबाई जाधव, सासू माजी सरपंच छाया जाधव, सासरे मोहन जाधव, दीर पंकज जाधव, जाऊ प्रियांका जाधव यांची साथ मिळाली. ग्रहणकाळात जे करायचे नाही ते करून दाखवत, पूजा यांनी आदर्श निर्माण केला.

Pooja Jadhav
Kolhapur Crime : पाण्याच्या टाकीत बुडवून अडीच वर्षांच्या चिमुरडीला केलं ठार; नराधमाला कोल्हापुरात अटक

हा उपक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व शंभूराजे प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला. पूजा-ऋषिराजसह कुटुंबीयांनी नातलगांच्या उपस्थितीत नुकत्याच जन्मलेल्या कन्यारत्नाचे राजनंदिनी असे दिमाखदार सोहळ्यात नामकरण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()