बैलजोडी विकली आलिशान कारच्या किंमतीला

the price of ox is 5 lakh 15 thousand in raibag belgaum
the price of ox is 5 lakh 15 thousand in raibag belgaum
Updated on

रायबाग (बेळगाव) : अलीकडे जनावरांना मोटारीची किंमत आल्याची उदाहरणे समोर येत आहेत. रायबाग तालुक्यातील हारूगेरी येथील कुरूकोडी शेतमळ्यातही शुक्रवारी त्याचा प्रत्येय आला. येथील शेतकरी अजाप्पा पद्माण्णा कुरी यांच्या खिलारी जातीच्या बैलाला तब्बल ५ लाख १५ हजार रूपये बोली लागली आहे. दत्ता ज्ञानेश्वर गराडे (रा. नंदेश्वर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी हा जातीवंत बैल खरेदी केला. शेतकऱ्याला लागलेल्या या लॉटरीची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

आपल्याकडे अजूनही कृषीप्रधान संस्कृती टिकून आहे. शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो. सध्या ट्रॅक्टरसह अन्य वाहने मदतीला असली तरी शेतकऱ्यांना आजही बैलाचा मोठा आधार आहे. काही हौशी शेतकरी मंडळी जातीवंत जनावरांची लाखो रूपयांना खरेदी करतात. त्याचा प्रत्येय हारूगेरी येथे आला. 

अजाप्पा कुरी यांनी मायाक्का चिंचणी येथील यात्रेतून खिलारी जातीचे वासरू १ लाख १ हजार रूपयांना खरेदी केले होते. त्याची योग्य निगा राखून जोपासना केल्याने त्याने चांगलेच बाळसे धरले. परिणामी त्याची चर्चा लोकांमार्फत मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वरच्या दत्ता गराडे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी हारूगेरीला भेट दिली. बैलाला पाहून तब्बल ५ लाख १५ हजार रूपयांना खरेदी केली. शुक्रवारी या बैलाला सजविले आणि सवाद्य मिरवणूकही काढली. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.

"मायाक्का चिंचली यात्रेतून आणलेल्या वासराची आपणासह कुटुंबीयांनी १६ महिने निगा राखली. त्याला ५ लाख १५ हजाराची किंमत आली. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना समाधान वाटत आहे."

- अजाप्पा कुरी, हारूगेरी, (ता. रायबाग, जि. बेळगाव)

"आमचे शेतकरी कुटुंब असून गोठ्यात जातीवंत १३ बैल आहेत. त्यातील एका बैलजोडीची किंमत १२ लाखांवर आहे. उर्वरीत बैल त्या खालोखालच्या किंमतीचे आहेत. केवळ छंद असल्याने गोठा जनावरांनी भरला आहे. त्यातून मिळणारे समाधान वेगळेच आहे."

- दत्ता गराडे, नंदेश्वर, (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर)

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.