जून महिन्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी नवीन भाजीपाल्यांची लागवड केली होती. परंतु अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले आहे.
लेंगरे : मागील दोन महिन्यांपासून कांदे व लसणाचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या (Vegetables) दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. आठवडी बाजारात कांदे ५० तर लसूण ३५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. गणेशोत्सव, गौरी ऐन सणासुदीत ही भाव वाढ झाल्याने सध्या लसणाचा तडका गृहिणीना महागात पडू लागल्याने लसूण वापरणे बंद करू लागले आहे.