गारगोटी, (जि. कोल्हापूर) - ‘राधानगरी मतदारसंघाला माझ्यामुळे ग्रहण लागले होते. ती माझी चूक आहे, हे मी मान्य करतो. ‘त्याला’ मी उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही ‘त्याला’ आमदार केले. आम्ही मान, सन्मान, प्रेम दिले. तरीही शिवसेना नावाच्या आईवरती वार करणारा हा माणूस तुमचा होऊ शकतो का? असा सवाल करीत राधानगरी मतदारसंघ गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही,’ असा सज्जड इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेनेचे राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांना उद्देशून ते बोलत होते.