अखेर राधानगरीचा 'तो' दरवाजा बंद करण्यात जलसंपदा विभागाला यश

आज सकाळी साडेआठच्या सुमारास धरण चौकीदाराला नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाहित झाल्याचे लक्षात आले.
Radhanagari Dam
Radhanagari DamSakal
Updated on

राधानगरी : राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) तिन सर्विस गेट पैकी एक दरवाजा अठरा फुटापर्यंत अचानक खुला झाल्याने मोठी तारांबळ उडाली. या दरवाजातून साडेपाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पत्रात सुरू झाल्याने नदीकाठावरील अनेक विद्युत पंप आणि पिके जलमय झाली आहेत. हे सर्विस गेट आपोआप खुला होण्याची उघडण्याची ही पहिलीच वेळ असून ही घटना तांत्रिक दोष की मानवी हस्तक्षेपामुळे घडली याची उच्चस्तरीय चौकशी (Investigation) सुरू झाली आहे.

आज सकाळी साडेआठच्या सुमारास धरण चौकीदाराला नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाहित झाल्याचे लक्षात आले. त्यानी चौकशी केली असता सर्विस गेटमधून हे पाणी जात असल्याची माहिती त्याने तातडीने पोलिस यंत्रणा व जलसंपदा विभागाला दिली. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी तातडीने घटनास्थळी आले, त्यांनी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला. मात्र जलसंपदा विभागाचे अधिकारी घटना घडल्यानंतर तब्बल चार तासाने घटनास्थळी पोचले. धरणाच्या मुख्य भिंतीत असलेल्या पाच पैकी दोन दरवाजातून पाणी वीज प्रकल्पाला दिले आहे. तर उरलेल्या तीन दरवाजांचा वापर उन्हाळ्यात नदीपात्रात सिंचनासाठी आवर्तने देण्यासाठी केला जातो.

Radhanagari Dam
ओमिक्रॉनची भीती! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा UAE दौरा पुढे ढकलला

पावसाळ्यात आणीबाणीच्या स्थितीतच हे दरवाजे जेमतेम चार ते पाच फुटापर्यंत उचलले जातात. यामुळे धरणावर येणारा पाण्याचा ताण कमी होतो. मात्र आज या पैकी एक दरवाजा पूर्णपणे म्हणजे 18 फूट उघडल्याने यातून साडेपाच हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने भोगावती नदीपात्रात सुरू झाला. परिणामी भोगावती नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नदीकाठावरील जलविद्युत पंप पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.

दरवाजा खुला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी नदी तीरावरील गावांना पोचल्यानंतर शेतकर्यांनी विद्युत पंप काढून घेतले' मात्र यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाळ्यापूर्वी या धरण दरवाजांची विशेष देखभाल दुरुस्ती केली जाते. कार्यकारी अभियंत्यांकडून तांत्रिक तपासणीही होते. हा दरवाजा आपोआप उघडला आणि तांत्रिक तपासणी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पूर नियंत्रण आणि धरण सुरक्षेसाठी सेवा दरवाज्यांचे ऑटोमायझेशन प्रस्तावित करण्यात आली आहे.

Radhanagari Dam
परीक्षांची तारीख ठरली, मात्र अभ्यासाचं काय?

कोल्हापूर दौऱ्यामध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची दखल घेऊन तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ऑटोमापझेशन प्रस्ताव गांभीर्याने घेतल्याचे बेदखल केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे धरण सुरक्षेसाठी दरवाजावर पोलिस यंत्रणा ठेवली असताना दुसरीकडे तांत्रिक बाबीकडे होणारे दुर्लक्ष हे अक्षम्य असल्याचे आजच्या घटनेवरून पुढे आले आहे. किमान येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी या धरणाच्या सेवा दरवाजांच्या ऑटोमायझेशनच्या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू. असे मत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी व्यक्त केले. तसेच धरणाच्या सर्विस गेटचे ऑटोमायझेशन करावेच लागेल हे या घटनेतून ठळक झाले आहे. अशी कबुली त्यांनी दिली.

Radhanagari Dam
थर्टीफर्स्ट, नववर्ष साजरं करताय? ही नवी नियमावली वाचा...

दरम्यान दुपारी एक वाजता कोल्हापूर वरून विशेष तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर प्रत्यक्ष दरवाजा बंद करण्याबाबत कार्यवाही सुरू झाल्या. दरवाजा पुर्ण बंद होईपर्यंत पाणी प्रवाह सुरु राहणार असल्याने किमान पाऊण ते एक टीएमसी पाणी धरणातून वाया जाणार आहे. भविष्यात उन्हाळ्यात पाऊस लांबणीवर गेल्यास जनमानसाला बसण्याची शक्यता आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आणीबाणीच्या काळात सेवा गेट खुले करण्यामुळे धरणावर येणारा ताण आणि यंत्रणेची उडणारी तारांबळ यामुळे यासाठी पर्यायी व्यवस्थेची गरज आहे. याकडे अनेकदा 'सकाळ' ने लक्ष वेधले आहे. आजच्या घटनेमुळे हा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.