मिरज रेल्वे पूल पाडायचा असेल तर त्याला समांतर लोखंडी पूल उभा करा. त्यावरून वाहतूक सुरू ठेवा आणि मगच पूल पाडा; अन्यथा आम्ही जनआंदोलन उभे करू, ’’असा इशारा शिवसेनेने दिला.
सांगली : स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरवण्यात आलेल्या सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वेचा (Railway on Sangli-Miraj Road) पूल पाडावा लागेल, अशी स्पष्टोक्ती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव (Ram Karan Yadav) यांनी केली. या पुलाला पर्यायी रस्ता देण्याची जबाबदारी रेल्वेची नाही; ती राज्य शासनाची आहे.
आम्ही धोका फार काळ तसाच ठेवू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी पूल पाडण्यास असलेल्या राजकीय विरोधाला झुगारून लावले. रामकरण यादव सांगली, मिरज दौऱ्यावर होते. त्यांनी सांगली रेल्वे स्थानकाची पाहणी केली. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी त्यांचे स्वागत करतानाच सांगली रेल्वे स्थानकावर (Sangli Railway Station) सुविधा पुरवण्याबाबत रेल्वेकडून सुरू असलेला दुजाभाव लक्षात आणून दिला. त्यावेळी मिरज रेल्वे पुलावर चर्चा झाली.
हा पूल धोकादायक आहे आणि फार काळ तो ठेवणे योग्य होणार नाही. त्यासाठी पर्यायी रस्ते लवकर करावेत, अशी सूचना त्यांनी केली. पुलाची रुंदी वाढवायची असेल तर त्यासाठीचा अतिरिक्त निधी राज्य शासनाने दिली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली रेल्वे स्थानकावरून फलाट क्रमांक चार आणि पाचवरती जाण्यासाठी पादचारी पुलाची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी आज जनआंदोलन उभे केले जाणार होते.
त्यानंतर पूल मंजूर करण्यात आला. त्याबाबत साखळकर यांनी रामकरण यादव यांचे आभार मानले. या पादचारी पुलाबाबतची कार्यवाही लवकर होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. चिंतामणीनगर येथील पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. ते काम गतीने करण्याबत ही अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रमोद पाटील, अमर निंबाळकर, शंभूराज काटकर, सुरेश साखळकर, शरद शहा, विजय शहा, राम काळे, डॉ. दिलीप पटवर्धन उपस्थित होते.
‘‘मिरज रेल्वे पूल पाडायचा असेल तर त्याला समांतर लोखंडी पूल उभा करा. त्यावरून वाहतूक सुरू ठेवा आणि मगच पूल पाडा; अन्यथा आम्ही जनआंदोलन उभे करू, ’’असा इशारा या वेळी शिवसेनेतर्फे देण्यात आला. जिल्हा उपप्रमुख शंभुराज काटकर यांनी यादव यांच्याशी याबाबत चर्चा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.