सांगलीत पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांचा उल्लेख वारं, आग असा केला होता.
देवराष्ट्रे (सांगली) : मी चांगला आहे, हे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना उशीरा समजले, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे एका खासगी समारंभानिमित्त ते आले होते. (political News) त्यावेळी त्यांनी काही राजकीय मुद्यांना स्पर्श केला. चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी (raju shetti) यांचा उल्लेख वारं, आग असा केला होता. ते कुणाच्या हाताला सापडत नाही, चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट म्हणतात, असे कौतुक केले होते. त्यावेळी शेट्टी म्हणाले, 'त्यांना मी काय आहे कळाले हे बरे झाले, मात्र समजायला जरा उशीर झाला.' (sangli News)
जयंत पाटील (jayant patil) यांच्यावर त्यांनी पुन्हा टीका केली. पंचगंगेचे पुराचे पाणी टनेलने कर्नाटकात सोडले तर कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोळचे पुराचे संकट टाळता येईल. परंतु राजू शेट्टी यांना प्रकल्प नको असेल तर रद्द करतो, अशी भूमिका जयंत पाटील यांनी घेतली होती. त्यावर शेट्टी म्हणाले, 'जयंत पाटील यांनी सूचवलेला प्रकल्प चुकीचाच आहे. तो उपयोगी ठरणार नाही, असे त्या विषयातील अभ्यासू लोक सांगत आहेत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.