सागाव (कोल्हापूर) ः महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना चिंता मुक्त केले नाही, तर मुख्यमंत्र्याच्या चिंता वाढतील' असा सुचक इशारा महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने नाराज असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. येथील शेतकरी दूध संकलन केंद्राच्या उद्घाटन समारंभावेळी नियोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच तात्या पाटील होते. यावेळी शिराळा पंचायत समितीच्या नवनियुक्त सभापती वैशाली माने यांचा सत्कार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
हे पण वाचा - भल्या पहाटेच चार जणांवर काळाचा घाला, समोरून बस आली आणि...
शेट्टी यांचा स्वाभीमानी शेकतरी संघटना हा पक्ष महाविकास आघाडीतील मीत्र पक्ष आहे. परंतु, मंत्रीमंडळ विस्तारात त्यांच्या पक्षाला एकही मंत्रीपद दिले नसल्याने पक्षात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. परवाच झालेल्या शपथ विधी सोहळ्यालाही शेट्टी हजर नव्हते. त्यातच त्यांनी दिलेला हा इशारा म्हणजे पक्षातील नाराजीचे चित्र असल्याचे बोलले जात आहे.
हे पण वाचा - कोल्हापूर झेडपीत अखेर सत्तांतर, काॅंग्रेसने डाव जिंकला
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, "ग्रामीण भागातील लहान मुलांच्या हातात पाटीपुस्तकाऐवजी दुधाची कीटली पहायला मिळत आहे. जोपर्यंत सरसकट शेतकरी कर्ज मुक्त होत नाही, तोपर्यत स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसनार नाही.
हे पण वाचा - त्याच्यासाठी त्यांनी रस्त्यावरच केले जेवण
यावेळी सरपंच तात्या पाटील म्हणाले, "स्पर्धेच्या युगात चांगला दर देऊन दूध उत्पादकांचा विश्वास सार्थ ठरेल.' यावेळी अशोक दिवे, तालुका अध्यक्ष राम पाटील, देवेंद्र धस, शरद नायकवडी, केरू नाकील, श्रीनिवास भागवत, मारूती चौगुले, सागर घोलप, रविंद्र पवार, अनिल आंबार्डेकर, भाऊसाहेब पाटील, जयसिंग पाटील, बंडोपंत उंडाळे, व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते . प्रास्तविक मानसिंग पाटील यांनी केले. सुरेश म्हाऊटकर यांनी सुत्रसंचालन केले. ऍड. रवि पाटील यांनी आभार मानले.
|