Ratan Tata : कुपवाडला Nano Car चं सूतोवाच; रतन टाटांचा तीन वेळा सांगली दौरा अन् 2008 मध्ये 'नॅनो' आली बाजारात

Ratan Tata : भारतीयांच्या मनात सन्मानाचे स्थान मिळवलेल्या रतन टाटा यांच्या जाण्याने सांगलीकर (Sangli) आज हळहळले.
Ratan Tata Visit Kupwad
Ratan Tata Visit Kupwadesakal
Updated on
Summary

रतन टाटा तीनवेळा सांगली जिल्ह्यात आले होते. तीनही वेळच्या आठवणी रम्य, लक्षवेधी आहेत.

सांगली : ‘सामान्य माणसाला परवडेल, अशी चारचाकी मला तुमच्यासाठी आणायची आहे’, असे सांगत प्रख्यात उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांनी ‘नॅनो’ कारबद्दलचे (Nano Car) सूतोवाच कुपवाडमध्ये केले होते. नॅनो बाजारात आली २००८ मध्ये, त्याआधी १२ वर्षे म्हणजे सन १९९६ मध्ये ते केपीटी उद्योग समूहाच्या कार्यक्रमासाठी कुपवाडमध्ये (Kupwad) आले होते. तेथे त्यांनी ही कल्पना मांडली होती. केपीटी उद्योग समूहाच्या प्रभाताई कुलकर्णी (Prabhatai Kulkarni) यांनी त्या आठवणीला उजाळा दिला.

रतन टाटा यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले. भारतीयांच्या मनात सन्मानाचे स्थान मिळवलेल्या रतन टाटा यांच्या जाण्याने सांगलीकर (Sangli) आज हळहळले. सोबतच त्यांच्या सांगलीसोबतच्या ऋणानुबंधाची चर्चादेखील सुरू झाली. रतन टाटा तीनवेळा सांगली जिल्ह्यात आले होते. तीनही वेळच्या आठवणी रम्य, लक्षवेधी आहेत.

Ratan Tata Visit Kupwad
'माझी संपूर्ण मालमत्ता बॉम्बने उडवून द्या, पण दहशतवाद्यांना..'; ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले होते रतन टाटा?
Ratan Tata Visit Kupwad
Ratan Tata Visit Kupwad

येथील प्रख्यात केपीटी उद्योग समूहाच्या कुपवाड औद्योगिक वसाहतीतील कास्टिंग प्लँटच्या (Casting Plant in Kupwad Industrial Estate) उद्‍घाटन समारंभात रतन टाटा प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. सोबत ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉ. पतंगराव कदम, भारत फोर्ब्जचे नीळकंठ कल्याणी, सेबीचे तत्कालीन अध्यक्ष एस. एस. नाडकर्णी उपस्थित होते. दिवसभर टाटा येथे रमले होते. येथील ऊस शेती पाहून ते भारावले होते. इथली समृद्धी सुखावणारी आहे, असा उल्लेख त्यांनी केल्याचे प्रभाताई सांगतात.

Ratan Tata Visit Kupwad
Ratan Tata : रतन टाटांचा 'डॉग हॅण्डलर' आहे कोल्हापूरचा; श्‍वानांची नावे आहेत 'T' अद्याक्षरावरून, जाणून घ्या कोणती..
Ratan Tata Visit Kupwad
Ratan Tata Visit Kupwad

रेडिओ, टीव्ही एजन्सीला भेट

तरुण उद्योजक म्हणून रतन टाटा यांनी सन १९७६ मध्ये राज्यभर दौरा केला होता. ते सांगलीत सर्वप्रथम यावर्षीच आले होते. टाटा कंपनीच्या नेल्को रेडिओची एजन्सी भारत वॉचच्या जैन कुटुंबीयांकडे तर टीव्ही एजन्सी गोगटे कुटुंबीयांकडे होती. बाबूलाल जैन, अनंत गोगटे यांनी त्यांचे स्वागत केले होते. तेव्हा रतन टाटा हे वितरकांच्या भेटीसाठी महाराष्ट्रभर फिरत होते. त्यांच्यासोबत कंपनीचे काही लोक होते. काळ्या रंगाच्या ॲम्बॅसिडर घेऊन ते आले होते. भारत वॉचचे अशोकराव जैन सांगतात, तेंव्हा मी १५-१६ वर्षांचा होतो. त्यानंतर काही काळाने माझे मोठे भाऊ भारत जैन यांच्या लग्नाची पत्रिका रतन टाटा यांना पाठवली होती. त्यांनी ५०१ रुपयांचा आहेर आणि शुभेच्छा पत्र पाठवले होते. टाटांसोबत जैन कुटुंबीयांचा एक फोटो भारत वॉचमध्ये नेहमी दिसायचा, मात्र महापुरात तो भिजला. आता फक्त आठवणी बाकी असल्याचे अशोकराव सांगतात. गोगटे यांच्याकडे रतन टाटा आणि अनंत गोगटे यांचा फोटो आहे.

Ratan Tata Visit Kupwad
Ratan Tata : रतन टाटांनी दत्तक घेतलेल्‍या 'या' गावांत शोककळा; 'टाटा ट्रस्‍ट'च्या माध्‍यमातून दिल्या अनेक नागरी सुविधा

भारावलं होतं इस्लामपूर

सन २०१३...रतन टाटा इस्लामपुरात येताहेत, ही बातमीच इथल्या लोकांना भारावून टाकणारी होती. तरुणाई उत्सुक होती. त्यांना भेटायला, ऐकायला. त्यांनी सात मिनिटांचं भाषण केलं, त्यात कल्पना, सृजनशीलता आणि त्यातून विकासाचा कानमंत्र दिला होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील कासेगाव शिक्षण संस्थेत १० नोव्हेंबर २०१३ मध्ये टाटा आले होते. राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभाचे ते पाहुणे होते. प्रत्येकजण त्यांच्यासोबत फोटोसाठी धडपडत होता. ते सभ्यपणे उभे होते. सर्वांचा सन्मान राखत होते. त्यांनी सात मिनिटांचे भाषण केले.

Ratan Tata Visit Kupwad
Ratan Tata Visit Kupwad

एका इंग्रजी वृत्तपत्र समूहाने देशभरातील पदवीदान समारंभातील उच्च दर्जाच्या दहा भाषणांचा उल्लेख केला, त्यात टाटा यांच्या इस्लामपूर येथील भाषणाचा समावेश होता. ७६ वर्षीय टाटांनी तासभर उभे राहून प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात हात देऊन पदवी प्रदान केली. व्यासपीठावरील मान्यवरांनी त्यांना बसून पदवीदान करा, असे सूचवले, मात्र त्यांनी नकार दिला. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी जयंत पाटील आणि त्यांचे बंधू भगतसिंह पाटील यांच्या कामाचे येथे कौतुक केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.