Jayant Patil : 'पृथ्वीतलावर माझ्या नावे घरच नाही! रात्री शांत झोप लागते, ED ला सामोरे जायला तयार'

मी प्रामाणिकपणे कामावर भर देणारा माणूस आहे. त्यामुळं ईडीची (ED) चौकशी होत असताना तिला सामोरे जायला तयार आहे.
Jayant Patil
Jayant Patilsakal
Updated on
Summary

सांगलीचं घर बापूंच्या नावावर होतं. ते आईच्या नावावर झालं. आता माझ्या नावावर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नेर्ले : पृथ्वीतलावर माझ्या स्वतःच्या नावाचं एकही घर नाही. मी प्रामाणिकपणे कामावर भर देणारा माणूस आहे. त्यामुळं ईडीची (ED) चौकशी होत असताना तिला सामोरे जायला तयार आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मांडली.

नेर्ले (ता. वाळवा) येथील नंबर दोन सर्व सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच संजय पाटील, सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष पोपट कदम, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, मिरज बाजार समितीचे संचालक जयवंत नलवडे उपस्थित होते.

Jayant Patil
Karnataka Election Result : 34 वर्षांनंतर काँग्रेसनं पुन्हा घडवला इतिहास; 1989 मध्ये तब्बल 178 जागांवर विजय

जयंत पाटील म्हणाले, "लोकांसमोर मान खाली घालायला लागेल, अशा प्रकारचं कृत्य माझ्याकडून आजपर्यंत झालेलं नाही. इथून पुढे देखील होणार नाही. सध्या जे चाललं आहे, त्याच्या विरोधी भूमिका आपण घेतोय. त्यांचं सरकार आहे, त्यांना जे करायचं ते करू देत. पृथ्वीतलावर माझं स्वतःचं घर नाही. सांगलीचं घर बापूंच्या नावावर होतं. ते आईच्या नावावर झालं. आता माझ्या नावावर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कासेगावमध्ये थोडीफार शेतजमीन आहे. त्यात वाटणी झाली आहे. मी कोणाकडून पैसे घेतले नाहीत. त्यामुळं मला रात्री शांत झोप लागते."

Jayant Patil
Nipani Election : शरद पवारांच्या उमेदवारानं दाखवली खिलाडूवृत्ती; पराभवानंतर उत्तम पाटलांनी केलं जोल्लेंचं..

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, "सोसायटी व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जीवनाला कलाटणी देण्याचं काम केलं आहे. सोसायटी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. " नेर्लेचे सरपंच संजय पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांना बजावलेल्या ईडीच्या नोटिसीचा निषेध नोंदवला. दिलीप पाटील यांनी स्वागत केलं. विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केलं. महेश पाटील यांनी आभार मानले.

Jayant Patil
Anil Bokil : 'प्रत्येकी 10 हजार द्या'; मोदींना नोटबंदीचा सल्ला देणाऱ्या बोकिलांनी लोकसभेपूर्वी ठोकला शड्डू

उपसरपंच महेश पाटील, शरद बल्लाळ, शैलाजा पाटील, मनीषा गडाळे, मंगल पोळ, दीपक माने, अनिल साळुंखे, राणी जामदार, भारती रोकडे, मनीषा माने, जयश्री कुंभार, कुमार माने, किरण पाटील, सहकार बोर्डाचे संचालक दिलीप पाटील, आनंदराव नलवडे, भालचंद्र पाटील, सुरगौंडा पाटील, बाबासाहेब पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.