'ओएमजी' बुकमध्ये पोसेवाडीच्या बाप-लेकीची नोंद 

Record of Posewadi's father-son in 'OMG' book
Record of Posewadi's father-son in 'OMG' book
Updated on

खानापूर  : पोसेवाडी (ता. खानापूर) येथील लक्ष्मीनारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे संस्थापक अध्यक्ष भगवान जाधव व नृत्य, अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रतीक्षा जाधव हिची 'ओएमजी' बुक ऑफ रेकॉडेने दखल घेऊन दोघांची बुक मध्ये नोंद केली. 

श्री. जाधव यांनी पोसेवाडीसारख्या गावात लक्ष्मीनारायण पुरातन वस्तू संग्रहालय स्थापन करून साडेसातशे वर्षापूर्वी पासूनच्या जुन्या मुर्ती, नाणी, नोटा पोस्टाची तिकिटे, जुनी वजन मापे, कॅमेरे, अडकीत्ते, पानपुडे, दिवे, आरत्या, पणत्या, कुंकवाचे करंडे, कंदील, जुनी भांडी, गॅसबत्त्या, तलवारी, भाले, ग्रामोफोन, रेडिओ, चरख्यांचे विविध प्रकार, मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या-संदेश, बॉंड पेपर हस्तलिखिते, जुने फोन, सेंटच्या बाटल्या, कुलपे आदी 12 हजार वस्तूंचा संग्रह त्यांनी केला आहे. वस्तूंची विविध ठिकाणी 120 प्रदर्शने भरवली. लक्ष्मी नारायण सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करून त्यांनी वाचन संस्कृती रूजवण्याचेही काम केले. 

श्री. जाधव यांची कन्या प्रतीक्षा जाधव हीनेही पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट काम करून शासन व विविध संस्थांचे पुरस्कार मिळवलेत. भरतनाट्यम्‌मध्ये सन 2015 मध्ये पहिला विश्वविक्रम, लावणी नृत्यांत सन 2016 मध्ये दुसरा विश्वविक्रम, पुन्हा लावणी नृत्यांत सन 2017 मध्ये तिसरा विश्वविक्रम केला. त्याची नोंद विविध बुकमध्ये झाली आहे. राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत. बॅकॉक, थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत कास्यपदक मिळवले. त्याची दखल घेऊन ओएमजी नॅशनल बुकचे डॉ. दिनेश गुप्ता यांनी घेतली. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.