धक्‍कादायक....एसटीच्या वाढत्या तोट्यामुळे भरती रखडली 

st bus
st bus
Updated on

सोलापूर : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याच्या हेतूने राज्य परिवहन महामंडळाने आठ हजार 22 पदांची भरती जाहीर केली. त्यानुसार चालक- वाहक पदांसाठी राज्यातून 60 हजार 387 तरुणांनी अर्ज केले. त्यापैकी 28 हजार 173 उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले. दुष्काळ संपला, महापुराच्या वेदनाही सोसल्या, सरकार बदलले मात्र, फेब्रुवारी 2019 पासून या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी झाल्याचे कारण अधिकारी पुढे करीत अधिकाऱ्यांनीच तोंडवर बोट ठेवले आहे. 

तरुणांची चिंता वाढल्याचे चित्र
गतवर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने पुणे, सोलापूर, बुलढाणा, धुळे, औरंगाबाद, जालना, जळगाव, अमरावती, परभणी, यवतमाळ, नाशिक व अकोला या दुष्काळी जिल्ह्यांमधून पहिल्या टप्प्यात चार हजार 416 चालक- वाहक पदांची भरती जाहीर केली. त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातून चार हजार पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले. महामंडळात भरती झाल्यानंतर मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल या हेतूने 60 हजार 387 तरुणांनी अर्ज केले. कागदपत्रे पडताळणीत दोन- तीन महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्टसाठी मैदाने उपलब्ध नसल्याने टप्प्याटप्यात टेस्ट घेतल्या जात असल्याचे सांगण्यात आले. आता तब्बल 11 महिन्यांचा काळ लोटला, मात्र लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार तरुणांना नियुक्‍ती मिळू शकलेली नाही. याबाबत नुतन परिवहन मंत्र्यांसह अधिकारीही काहीच बोलत नसल्याने या तरुणांची चिंता वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

भरतीची स्थिती 
चालक-वाहकांची भरती 
8,022 
अर्जदार तरुण 
60,387 
लेखी परीक्षा उत्तीर्ण तरुण 
28,173 


  • ठळक बाबी... 
  • राज्य परिवहन महामंडळाला 18 हजार 500 बस वाहतुकीसाठी चालक-वाहकांची कमतरता 
  • दुष्काळग्रस्त 28 हजार 173 तरुणांना अकरा महिन्यानंतरही मिळेना नियुक्‍ती 
  • चालकांची ड्रायव्हिंग टेस्ट संपेना : भरतीबाबत परिवहन मंत्र्यांसह अधिकारी काहीच बोलेनात 
  • दुष्काळग्रस्त तरुण भरतीच्या प्रतीक्षेत : रोजगारासाठी अनेकांनी केले स्थलांतर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.