Sugar Factories : साखर कारखान्यांना मोठा दिलासा; मूल्यांकन दरात प्रतिक्विंटल 3,100 वरून 3,400 रुपयांपर्यंत वाढ

राज्य सहकारी बँकेने साखरेच्या मूल्यांकन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sugar Factories
Sugar Factoriesesakal
Updated on
Summary

राज्य सहकारी बँकेने साखरेचा मूल्यांकन दर वाढविण्याची मागणी साखर संघाने सातत्याने करत पाठपुरावा केला होता.

असळज : खुल्या बाजारातील साखरेच्या दरात झालेली वाढ विचारात घेता राज्य सहकारी बँकेने साखरेच्या मूल्यांकन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रतिक्विंटल मूल्यांकनामध्ये ३०० रुपये वाढ केली असून मूल्यांकन ३,१०० वरून ३,४०० रुपयांपर्यंत वाढले आहे.

वाढलेल्या मूल्यांकनामुळे साखर कारखान्यांना (Sugar Factories) दिलासा मिळणार असून जादा मूल्यांकनातून उपलब्ध होणाऱ्या रकमेचा वापर एफआरपी (FRP) आदा करण्यासाठी होणार आहे. साखरेच्या दरात झालेली वाढ विचारात घेता, राज्य सहकारी बँकेने साखरेचा मूल्यांकन दर वाढविण्याची मागणी साखर संघाने सातत्याने करत पाठपुरावा केला होता.

Sugar Factories
Hasan Mushrif : 'कोल्हापूरच्या हद्दवाढीची मुख्यमंत्री शिंदे करणार लवकरच घोषणा'; 'या' गावांचा असणार समावेश

त्यास अनुसरून साखर संघाने बाजारभावाचे दर प्रमाणित करून दिल्यास साखरेचे मूल्यांकन करण्याची तयारी राज्य बँकेने दर्शविली होती. साखर संघाने मागील तीन महिन्यांच्या साखरेचा सरासरी दर प्रमाणित करून राज्य सहकारी बँकेस दिला होता. मात्र पुन्हा बँकेने रिकव्हरीनिहाय साखर उत्पादन प्रतिक्विंटल खर्चाचा तपशील उपलब्ध झाल्यास मूल्यांकन दराबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कळविले होते. त्यास अनुसरून राज्य सहकारी बँकेने त्यांच्याकडील २७ डिसेंबर २०२३ च्या पत्रान्वये साखरेचा मूल्यांकन दर २८ डिसेंबरपासून प्रतिक्विंटल ३४०० रुपये केल्याचे कळविले आहे.

Sugar Factories
निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडेल, पुन्हा ती उभीच राहणार नाही; मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा निशाणा

राज्य बँकेच्या या निर्णयामुळे एकूण मूल्यांकनाच्या ९० टक्के प्रमाणे कारखान्यास कमाल उचल दर ३०६० रुपये होणार आहे. यातून कारखान्यास प्रतिक्विंटल प्रक्रिया खर्चासाठी २०० रुपये व बँक कर्ज वसुलीपोटी ६५० रुपये रक्‍कम वजा जाता ऊस बिलासाठी बँकांकडून कारखान्यांना प्रतिटन २२१० रुपये मिळणार आहेत. या निर्णयामुळे ऊस बिले आदा करणेसाठी अतिरिक्त रक्कम उपलब्ध होणार आहे. जादा मुल्यांकनामुळे उपलब्ध होणारी रक्कम ही एफ.आर.पी. आदा करण्यासाठी वापरता येईल.

कारखान्यांना मिळणारा उचल दर ३०६०

  • मधून पुढीलप्रमाणे रक्कम उपलब्ध होईल

  • ऊस बिल आदा करण्यासाठी प्रतिटन : २२१० रुपये

  • प्रक्रिया खर्चासाठी प्रतिक्विंटल : २०० रुपये

Sugar Factories
NCP Crisis : भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? दिलीप वळसे-पाटलांचं 'साहेब-दादां'बाबत परखड भाष्य

बँक वसुलीसाठी

  • अल्पमुदत कर्ज : २५० रुपये

  • नजरगहाण कर्ज : २५ रुपये

  • वर्किंग कॅपिटल टर्म लोन : १०० रुपये

  • पॅकेज पुनर्बांधणी कर्ज हप्ता : १०० रुपये

  • थकीत व्याज : ७५ रुपये

  • अतिरिक्त टॅगिंग : १०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.