ताकारी योजना सुरु करुन शेतीपिकांना दिलासा द्या

Relieve the farmers by starting Takari Yojana
Relieve the farmers by starting Takari Yojana
Updated on

वांगी : ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात बारमाही आणि वाढलेल्या रब्बी क्षेत्रासाठी सध्या जमीनीतून प्रचंड पाणीउपसा होत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. पाणीपातळी खालावण्यापूर्वीच ताकारी योजना सुरु करुन शेतीपिकांना दिलासा द्यावा.अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. 

गतवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनचा प्रचंड पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच-पाणी झाले होते. दरम्यान नियमीत बारमाही पिकांसह रब्बी हंगामातील पिकांसाठी जमीनीतून दैनंदिन भरमसाठ पाणीउपसा होऊ लागला आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वीच ओढे आटले आहेत. सततच्या उपशामुळे विहिरींतील पाणी तळ गाठत आहे. उथळ भागातील विहिरी सांगळ्यावर आल्या असून बोअरवेलचे पाणीही कमी झाले आहे. 

काही दिवसातच पाण्याचा खडखडाट होऊन पिकांचे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गतवर्षी 27 डिसेंबरला ताकारीचे पहिले आवर्तन सुरु करावे लागले होते. प्रचंड पावसामुळे पाटबंधारेवरचा ताण कमी झाला आहे. मात्र आठ दिवसांनी कमी-अधिक लाभक्षेत्राला पाण्याची गरज भासणार आहे. पाटबंधारेने त्यादृष्टीने नियोजन करुन चार दिवसांत ताकारी योजना सुरु करावी. जेणेकरुन सर्वत्रच पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर पाणी सोडल्यास शेतकरी आणि पाटबंधारे कर्मचा-यांत होणारे वादविवाद टाळता येतील. 

ताकारी सुरु करण्याचे दृष्टीने सर्व तयारी झाली आहे. पाण्याची गरज लक्षात घेऊन 10 डिसेंबरपूर्वी पाणी सोडले जाणार आहे. शेतक-यांनी निश्‍चिंत रहावे. 
- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.