मुंबई कर्नाटकाच्या नामांतराचा घाट

कित्तूर कर्नाटकाचा प्रस्ताव; मुख्यमंत्र्यांची नामांतरबाबत प्रतिक्रिया
मुंबई कर्नाटकाच्या नामांतराचा घाट
मुंबई कर्नाटकाच्या नामांतराचा घाटsakal
Updated on

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना बेळगावचे बेळगावी असे नामांतर केलेल्या कर्नाटक सरकारने आता मुंबई कर्नाटकाला कित्तूर कर्नाटक असे नामकरण करण्याचा घाट घातला आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटकाला मुंबई कर्नाटक असे संबोधले जाते. या नावाला आक्षेप घेऊन कित्तूर कर्नाटक नाव देण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे बुधवारी (ता.२०) बेळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत विषय ठेवून कित्तूर कर्नाटक संदर्भात घोषणा करू, अशी माहिती दिली.

बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रामध्ये सामील केली जावीत, या मागणीसाठी सहा दशकापासून मराठी भाषक लढतोय. रस्त्यावरील लढाई एकीकडे लढली जात असताना सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल आहे. सीमाप्रश्‍न न्यायप्रवीष्ठ असताना निकाल लागेपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवणे अपेक्षित आहे. पण, कर्नाटकात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी पहिल्यांदा मराठी भाषिकांवर आगपागखड सुरु करते. लोकशाही पध्दतीने लढणाऱ्या मराठी भाषिकांच्या हक्कावर गदा आणली जाते. दुसरीकडे बेळगाव व महाराष्ट्राशी असलेली नाळ कशी तोडता येईल, त्यावर जोर दिला जातो.

मुंबई कर्नाटकाच्या नामांतराचा घाट
भारतात येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR चाचणी बंधनकारक

२०१४ मध्ये बेळगावचे बेळगावी असे नामांतर केले आहे. आता बेळगावसह उत्तर कर्नाटकाला मुंबई कर्नाटक म्हणून ओळखले जात असताना त्याला आक्षेप घेत कित्तूर कर्नाटक असे नामकरण करण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री बोम्मई बुधवारी बेळगाव दौऱ्यावर होते. या दरम्यान नामांतर संदर्भात प्रश्‍न विचारल्यानंतर त्यांनी नामांतराचा प्रस्ताव सरकारपुढे असल्याचे सांगितले. मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवला जाईल व त्यानंतर कित्तूर कर्नाटक या भागाची घोषणा केली जाईल, अशी माहिती दिली.

पाऊलखुणा मिटविण्यासाठी धडपड

बेळगावसह राज्यामधील सात शहरांची नावे बदलली जावीत, याबाबतचा प्रस्ताव कित्येकवर्षे प्रलंबित होता. पण, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला मंजूरी दिली. त्यात विशेष म्हणजे वादग्रस्त भूभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावचा समावेश झाल्यामुळे आक्षेप घेतला गेला. सर्वोच्च न्यायालयात प्रश्‍न प्रलंबित असताना नामांतर चुकीचे आणि नियमबाह्य असल्याचा आरोप झाला आहे. येथील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवणे अपेक्षित आहे. परंतु, नामांतराचा सपाटा सुरु ठेवत तेथील महाराष्ट्र आणि मराठीच्या पाऊलखुणा मिटविण्याचा घाट घातला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.