चिखलात अडकलेल्या गायींची सुटका

resque cow from mud
resque cow from mud
Updated on

सांगली ः कळंबी सिद्धेवाडीच्या हद्दीतील काकासाहेब पाटील यांच्या शेतात बांधाशेजारील पंधरा फूट खोल चिखलात तीन खिलार गाई आणि एक वासरू अडकून पडले होते. पिण्याच्या पाण्याच्या शोधात हा प्रकार घटला होता. या गायींना चिखलातून बाहेर काढण्याची मोहिम ऍनिमल राहत संस्थेने फत्ते करून दाखवली.


शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. याची बातमी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरली. गाय वाचवण्याचा थरार पाच वाजल्यापासून रात्री नऊपर्यंत सुरु होता. गावकऱ्यांना गाईचे वासरू चिखलातुन काढण्यात यश आले, पण तीन मोठ्या गायी या पोटापर्यंत चिखलात रुतल्या होत्या. त्या काढणं अत्यंत अवघड झालं होतं. त्या गाईनीही स्वतः धडपड सुरू केली पण त्या आणखी जास्त चिखलात रुतू लागल्या. शेवटी गावातील लोकांकडून रात्री उशिरा सांगलीतील ऍनिमल राहत रेस्क्‍यू टीमला बोलावण्यात आले.


अनिमल राहतचे डॉ. अविनाश विसलकर, किरण नाईक, दिलीप शिगाणा, सुनील मगदुम, सागर भानुसे, प्रसाद सुर्यवंशी आणि कौस्तुभ पोळ हे सदर घटना स्थळी पोहचले. गावकऱ्यांच्या मदतीने पुन्हा गाई वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, पण चिखलात उतरून गाईंना उचलण्यासाठी बेल्ट लावणे शक्‍य होत नव्हते. इतका चिखलगाळ होता की खाली उतरलेली व्यक्ती ही त्यातच अडकली असती, रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत रेस्क्‍यू टीमनी अथक प्रयत्न केले.

वजनदार गायी त्या चिखलात अडकलेल्या, बाहेर पडायच्या प्रयत्नात त्यांची दमणूक झालेली, अशात त्यांच्या सुटकेचा प्रयत्न करणेच त्यांच्या जीवावर बेतले असते. जेसीबी यंत्राने हे जमले असते, मात्र ते उपलब्ध होईना. उपविभागीय पोलीस अधिकारी मिरजचे कर्मचारी मनोज जाधव, आकाश जाधव, सदाशिव बामणे हे मिरज पंढरपूर रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते.

राहतच्या रेस्क्‍यू टीमने त्याना सर्व प्रकार सांगितला आणि जेसीबी शोध सूरु झाला. राहत टीम व पोलीसांनी दिलीप बिल्डकॉमचे व्यवस्थापक मनोजसिंग भदोरिया यांची मदत घेतली. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर गायींना सुखरूप बाहेर काढता आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.