निवडणुकीमुळे बेळगावात मद्यविक्रीवर निर्बंध

हॉटेल्स, धाब्यांची तपासणी; बेकायदा मद्यविक्रीवर ‘अबकारी’ची नजर
निवडणुकीमुळे बेळगावात मद्यविक्रीवर निर्बंध
sakal
Updated on

बेळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अबकारी खाते सतर्क झाले असून, बेकायदेशीररित्या मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. हॉटेल्स आणि धाब्यात ग्राहकांना मद्यप्राशन करण्यावरही निर्बंध लादण्यात आले.

जिल्ह्यात गोवा बनावटीच्या मद्यासह बेकायदा मद्यविक्रीचे व्यवसाय तेजीत सुरू आहेत. कोणत्याही प्रकारचा मद्यविक्री परवाना नसतानाही अनेक ठिकाणी खुलेआम मद्यविक्री केली जात आहे. त्यामुळे परवानाधारक दुकानदारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अबकारी खात्याकडून बेकायदा मद्यविक्री व्यवसायात गुंतलेल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गोवा आणि लष्करी कोट्यातील दारुची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. बेकायदा मद्यविक्री व्यवसायात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

त्यातच विधान परिषदेची निवडणूक घोषित झाल्याने जिल्ह्यात आचारसंहिता जारी झाली आहे. त्यामुळे निवडणूक काळात जिल्ह्यातील हॉटेल्स आणि धाब्यामध्ये ग्राहकांना मद्यप्राशन करण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच हॉटेल्स आणि धाब्यामध्ये तपासणीही केली जात आहे. एकाद्या ठिकाणी बेकायदेशीररित्या मद्यविक्री सुरु असल्यास त्याची माहिती अबकारी खात्याच्या नियंत्रण कक्षाला दिल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई केली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी जारी केला आहे. विधान परिषदेसाठी शुक्रवारी (ता. १०) मतदान, तर मंगळवारी (ता. १४) मतमोजणी होईल.

या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. कायदा व सुव्यवस्था कायम राहावी. निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काल (ता. ८) दुपारी चारपासून शुक्रवाररपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याची सूचना केली आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी मंगळवारी मद्यविक्री दुकाने बंद राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()