Jayant Patil : राज्यातील दंगलींचा एकच पॅटर्न - जयंत पाटील

जिथे विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडवल्या जात आहेत
riots in the state are being deliberately created by someone ncp state president jayant patil criticized politics
riots in the state are being deliberately created by someone ncp state president jayant patil criticized politicssakal
Updated on

सांगली : `‘राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत. त्या एकाच पॅटर्ननुसार होत आहेत,’’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.

जिथे विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडवल्या जात आहेत. विरोधकांची ताकद दाबण्याचा हा प्रयत्न आहे काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत पाटील यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले,‘‘पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सलोखा बिघडवून दंगली होत आहेत.

riots in the state are being deliberately created by someone ncp state president jayant patil criticized politics
Jayant Patil : "दंगली घडवल्या तर कुणाचा फायदा होतो, हे जगजाहीर..." ; जयंत पाटलांचा रोख कुणावर?

खरं तर या दंगली घडविल्या जात आहेत, अशी शंका आहे. राज्यात घडणाऱ्या दंगली एकाच पॅटर्ननुसार होत आहेत. ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडविल्या जात आहेत. कोल्हापूर, नाशिक, नगर येथील दंगली पाहिल्यानंतर त्याबद्दल शंका येऊ लागते. गृहमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवावी. आम्ही विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला तयार आहोत.’’

riots in the state are being deliberately created by someone ncp state president jayant patil criticized politics
Sangli : महामार्गावर भरधाव कारची दुभाजकाला जोराची धडक; अपघातात चालकासह दोघे जागीच ठार

‘मविआ’ पुढे टिकाव लागणार नाही

जयंत पाटील म्हणाले,‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व्हे केला आहे. शिंदे यांना लोकांचा चांगला पाठिंबा आहे, तर भाजपने याचा विचार करावा. पण, महाविकास आघाडीपुढे यांचा टिकाव लागणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.