कऱ्हाड : अलीकडे वाहतुकीची समस्या जटिल बनली आहे. रस्ते लहान आणि वाहनांची संख्या मोठी यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा त्रास वाहतूक पोलिसांना सातत्याने होतो. त्याचा विचार करून येथील एसपी रोबोटिक्स मेकर लॅब या संस्थेच्या विद्यार्थी संशोधकांनी सत्यजित मोहंती यांच्या सहकार्याने रोडिओ या रोबोटची निर्मिती केली आहे. त्याव्दारे वाहतूक नियंत्रण करता येणे शक्य आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
सिग्नल नियंत्रणासह वाहतुकीच्या सूचना देण्याचीही कार्यवाही त्या रोबोटव्दारे होणार आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रस्ते लहान आणि वाहने जास्त अशी स्थिती सध्या झाली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वाहनांच्या पार्किंगचा विचारच केला जात नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने लावली जातात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी पालिकेमार्फत सिग्नलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या सिग्नलची अंमलबजावणी करताना आणि वाहतुकीची कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येते. शहरात दररोजच ही स्थिती होते. त्यामुळे आता वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्राधान्य देणे आणि वाहतूक पोलिसांवरील ताण कमी करणे गरजेचे बनले आहे.
हेही वाचा - Video : शिवेंद्रसिंहराजे काळजी करू नका ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दिलासा
त्याचा विचार करून येथील एसपी रोबोटिक्स मेकर लॅब या संस्थेच्या आदी शहा, अरिहंत देसाई, अरहम शहा, आर्या जोशी, विराज पाटील, पारस माने, दिवीत कुंदन, सक्षम कुंदन, ध्रुव कोटणीस, वैभव सूर्यवंशी, वैभव घाटगे, सोहम कुलकर्णी, अमित माने, प्रणव जंगम, हर्षवर्धन देशमुख, वेदांत कुलकर्णी, यश पाटील या विद्यार्थी संशोधकांनी श्री. मोहंती, श्रीधर सावंत, मारुती बोराडे, रोहित शिंदे यांच्या सहकार्याने रोडिओ या रोबोटची निर्मिती केली आहे. चार फूट उंचीच्या या रोबोटव्दारे वाहतूक नियंत्रण करणे, ई-चलन करणे, वाहनांचे फोटो काढणे, वाहतुकीच्या नियमांची माहिती देणे, प्रदूषणाबद्दल माहिती देणे आदींची कार्यवाही होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे काम हलके होण्यास मदत होणार आहे. हा रोबोट रिमोट कंट्रोलव्दारे ऑपरेट करता येणार आहे.
हेही वाचा - महाबळेश्वर : नीलम नारायण राणेंसह तीस मिळकतधारकांना नोटीस
""अलीकडची मुले फारच "टेक्नोसॅव्ही' आहेत. त्यामुळे त्यांच्या बुद्धीला सतत चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने नवनिर्मिती करणारे उपक्रम आमच्या संस्थेत राबवत असतो. त्यातूनच या "रोबोट'ची निर्मिती झाली आहे.''
- सत्यजित मोहंती, कराड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.