'विरोधकांनी खालची पातळी गाठली, आबांना वडील न म्हणता...'

घरात बसून आबांचा वारसा सांगितला असता, तर लोकांनी स्वीकारलं नसतं.
sangli
sangliesakal
Updated on
Summary

घरात बसून आबांचा वारसा सांगितला असता, तर लोकांनी स्वीकारलं नसतं.

सांगली - जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर व कवठेमहांकाळ (kavathe mahankal) या तीन नगरपंचायतींसाठी (Nagar panchayat election 2021) आज मतदान होत आहे. प्रत्येकी १३ जागांसाठी मतदान होणार आहे; तर ओबीसीतून खुल्या गटात वर्ग करण्यात आलेल्या प्रत्येकी चार, अशा १२ जागांसाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर सर्व १९ जागांची मतमोजणी होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी आहे. (Sangli News) दरम्यान जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यातील नगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवंगत नेते आर. आर. पाटील (RR Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil) विरुद्ध सर्व पक्ष अशी वर्चस्वासाठीची लढाई येथे पहायला मिळत आहे. याशिवाय राज्यमंत्री विश्वजीत कदम विरुद्ध भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (Pruthviraj deshmukh) यांच्यात वर्चस्वाचा सामना पाहायला मिळणार आहे.

sangli
मोदींचा लस प्रमाणपत्रावरचा फोटो हटवण्याची मागणी पडली 1 लाखाला

दरम्यान, आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. कवठेमहांकाळ नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या (NCP) पॅनेललाच यश मिळेल असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे. आज ते कवटेमहांकाळ येथे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, घरात बसून आबांचा वारसा सांगितला असता, तर लोकांनी स्वीकारलं नसतं. गेली पावणेदोन वर्ष पक्षाच्या माध्यमातून भरघोस विकास कामे केली आहेत. मागील दोन वर्षात या शहरात काय काम केले ? कशा पद्धतीने केले? आणि आता काय करणार आहे हे लोकांसमोर ठेवले आहे. लोकांना विकास पाहिजे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून इथला मतदार राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाला साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

sangli
Banda Political News: राणेंनी समजूत घालताच बांदेकरांनी घेतला अर्ज मागे

विरोधकांना कोपरकळ्या देत ते म्हणाले, काही लोकांनी 'राईचा पर्वत' केल्यासारखे केलं. विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. आबांसाठी वडील या शब्दाऐवजी 'बाप' हा शब्द अनेकांकडून ऐकायला मिळाला. त्याचाच धागा पकडत माझा बाप पाठवल्या शिवाय राहणार नाही असा शब्द वापरला असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या भागात आत्तापर्यंत संघर्षाचे चित्र होतं, त्या संघर्षाच्या क्षेत्रात निश्चितपणे यापुढच्या काळात एक वेगळं चित्र दिसेल, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी आबांची उणिव भासत असून आज ते असते तर वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केले असते असे म्हणत आठवणींना उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.