Mohan Bhagwat : 'भोग-उपभोगामुळे पाश्चात राष्ट्रे विकृतीकडे चाललीयेत'; RSS सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्त्वाचं विधान

भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि दर्शन याचे साऱ्या जगाला अप्रूप आहे.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwatesakal
Updated on
Summary

''धर्माधर्मातील अहंकारी मतभेदांमुळे अंतिम सत्याकडे पोचू शकत नाही. यासाठी अनेक आचार्य आणि विद्वान पंडितांनी आत्मविश्वासपूर्वक आपले ज्ञान जगाला दिले आहे.''

बेळगाव : भोग व उपभोग यामुळे पाश्चात राष्ट्रे विकृतीकडे चालली आहेत. परंतु, भारतामधे आस्था आणि चिंतन याची पक्की बैठक आहे. भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि दर्शन याचे साऱ्या जगाला अप्रूप आहे. यामुळेच आपण आपली परंपरा आणि एकता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले.

हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या (Gurudev Ranade Temple) शताब्दी महोत्सवी सोहळ्याचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. १) पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास श्रीरामचंद्र मिशनचे (हैदराबाद) पद्मभूषण कमलेश पटेल (दाजी) यांची प्रमुख उपस्थिती होती. गोगटे कॉलेजमधील के. के. वेणुगोपाल सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी ‘फुटप्रिंट्स ऑन द सायन्स ऑफ टाईम’ पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला.

Mohan Bhagwat
Sangli Crime : सांगली गुन्ह्यांच्या मालिकेनं हादरलं! सहा महिन्यांत तब्बल 26 खून अन् 68 महिलांवर बलात्कार

ते पुढे म्हणाले, ‘‘आपल्या आचरणातून सज्जनता दिसली पाहिजे. सामाजिक समरस्येतून एकता निर्माण शक्य आहे. भारतवर्षाला अशी जीवन पद्धती पूर्वापार लाभलेली आहे. आपण सारे एक आहोत. मी सर्वांचा आहे आणि सर्व माझ्यात आहेत, अशी आपली धारणा असली पाहिजे. ती अनेक वर्षांपूर्वी दृढ होती. पण याची विस्मृती अलीकडच्या काळात झाली आहे. हे सत्य जाणण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण त्यातील चढाओढीमुळे ते ध्येय गाठता येत नाही.

अर्थ, धर्म, काम, मोक्ष यालाही काही नियम आहेत. मोक्षाकडे जाण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अनुभूतीतून ज्ञानसंपदा दिली आहे. गुरुदेव यांचेही विचार हेच आहेत. अनुभूती नसेल तर प्रचिती येत नाही. मन, बुद्धी, शरीर मुख्य आहेत. पण यातून आत्मतृप्ती मिळत नाही. ती मिळवण्यासाठी आस्था व चिंतन याची परिपूर्ण बैठक परिश्रमपूर्वक साधता आली पाहिजे. पुरातन काळात जे काही सांगता आले, त्याचा सम्यक विचार भारतातच होत आहे. आपल्या सृष्टीला संपन्न बनवणे हे भारताचे लक्ष आहे. हे साऱ्या भारतात आधी होते, पण धर्माधर्मातील अहंकारी मतभेदांमुळे अंतिम सत्याकडे पोचू शकत नाही. यासाठी अनेक आचार्य आणि विद्वान पंडितांनी आत्मविश्वासपूर्वक आपले ज्ञान जगाला दिले आहे.’’

पद्मभूषण कमलेश पटेल (दाजी) यांनीही मार्गदर्शनपर विचार मांडले.याप्रसंगी अकॅडमी ऑफ कॉम्पेरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन (एसीपीआर) संघटनेचे ॲड. अशोक पोतदार व्यासपीठावर उपस्थित होते. गुरुदेव रानडे यांच्या ग्रंथसंपदेतून साकारलेल्या सात पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. स्वाती जोग यांनी सूत्रसंचालन केले. किशोर काकडे यांनी गीत सादर केले. डॉ अश्विनी जोग (सोलापूर) यांनी आभार मानले. संस्थेचे सचिव ॲड्. एम. बी. जिरली यांनी परिचय करून दिला. संस्थेचे सुब्रमण्यम भट, अमित कुलकर्णी, आर. के. जकाती यांच्यासह अन्य निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.