सांगली : राज्यातील देशी दारू, बिअरबार चालकांच्या नुकसानीची शरद पवार (sharad pawar) यांना काळजी लागली आहे. त्यांच्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना (CM uddhav thakrey) पत्र लिहित आहेत, मात्र या जाणत्या राजाने शेतकऱ्यांच्या अश्रूकडे, कष्टकऱ्यांच्या वेदनांकडे लक्ष देण्याची गरज होती. शेती उद्ध्वस्त झाली आहे, शेतमाल कुजून जातो आहे. अशावेळी शेतकऱ्यांना या संकाटातून बाहेर काढण्यासाठी या खरीप हंगामात त्यांना गांजा पिकवायला परवानगी द्यावी. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्र लिहून परवानगी मागावी, अशी खोचक मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, आमदार सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, 'शरद पवार यांचे पत्र वाचून मला एकच प्याला नाटकाची (ek ch pyala)आठवण झाली. त्यातील नायक सुधाकर याला त्या एकाच प्यालात गरिबांच्या झोपड्या, अनेकांचे श्रम, दीनदलितांच्या व्यथा सामावल्यासारख्या वाटत होत्या. पवारसाहेबांचे तसेच झाले असावे. राज्यात शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. फळे, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. बाजारपेठ बंद आहे. (market close) कांदा अडचणीत आहे. गारपीट, अवकाळीच्या भरपाईची चर्चाही नाही. नाशवंत शेतमालाचे नियोजन सरकारने करायला हवे होते. तसे झाले नाही. जिल्हानिहाय धोरण वेगळे आहे.'
पुढे ते म्हणाले, 'राज्यात कुठेही एकवाक्यता नाही. अशा परिस्थितीत खरीप हंगाम तोंडावर आला आहे. खते आणि बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कर्ज लागेल. मागची थकबाकी असताना ते कसे मिळणार? त्याबाबत धोरण नाही. त्यामुळे जाणत्या राजाने शेतकऱ्यांना गांजाची पेरणी करण्याची परवागनी द्यावी. एका वर्षात शेतकरी कर्जमुक्त होईल. दारु काय अन् गांजा काय? दोन्ही नशाच. त्यामुळे चिंता नसावी. खरे तर शेतकऱ्यांनीच दारू तयार केली असती, मात्र तुमच्या चेल्यांनी एवढ्या भट्ट्या उभ्या केल्या आहेत की आम्हाला हातभट्टी उभा करायलाही जागा नाही.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.