नगरला सहा फेब्रुवारीपासून सकाळ शॉपिंग महोत्सव

Sakal Shopping Festival starts from February 6
Sakal Shopping Festival starts from February 6
Updated on

नगर : सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या सकाळ शॉपिंग महोत्सवातील स्टॉल बुकिंगला याही वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. नगरकरांसाठी दरवर्षीच उत्कंठा ठरत असलेल्या या शॉपिंग महोत्सवात एकाच छताखाली सर्व प्रकारच्या घरगुती वापराच्या विकसित तंत्रज्ञानातील नवनवीन उत्पादनांची विक्री करणारे व्यावसायिक सहभागी होतात.

अत्याधुनिक सुविधा मिळवून देणारी उत्पादने खरेदी करणाऱ्या चोखंदळ ग्राहक व उद्योजक-वितरकांना एकत्र आणणाऱ्या या महोत्सवात सहभागी होण्याची प्रत्येकाची अतीव इच्छा असते. त्यात नेहमीप्रमाणे पहिल्याच दिवशी खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे "फुल्ल' बुकिंग झाले. आता त्यातील थोडेच व्यावसायिक स्टॉल शिल्लक आहेत. 

स्टॉल बुकिंगला जोरदार प्रतिसाद

नगरकरांसाठी महाखरेदी व विक्री उत्सव ठरणारा सकाळ शॉपिंग महोत्सव या वर्षी सहा ते नऊ फेब्रुवारीदरम्यान सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत पारिजात चौकातील तांबटकर मळा मैदानावर होत आहे. आर्थिक मंदीच्या तोंडावर नगरच्या बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण करणाऱ्या "सकाळ नगर शॉपिंग महोत्सवा'मध्ये स्टॉल बुकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उद्योजक व वितरकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत नवनवीन उत्पादने पोचविण्याची चांगली संधी या निमित्ताने उपलब्ध होत असल्याची प्रतिक्रियाही अनेक व्यावसायिकांनी स्टॉल बुकिंग करताना व्यक्त केली. 

ग्राहक व व्यावसायिक यांच्यात दुवा

नवनवीन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयुक्त वस्तू, तसेच साहित्याचे आकर्षण ग्राहकांना असतेच. परंतु धावपळीच्या जीवनात उपलब्ध असलेल्या वेळेत त्या वस्तू कुठे शोधाव्यात, अशी ग्राहकांची अडचण असते. सकाळ शॉपिंग महोत्सवातून ग्राहक व वितरक या दोघांचीही ती अडचण सहजच दूर होते. उत्पादक व व्यावसायिकही चांगल्या ग्राहकांच्या माध्यमातून व्यवसायवृद्धीच्या प्रयत्नात असतात. त्यामुळेच ग्राहक व व्यावसायिक यांच्यात दुवा साधणारा "सकाळ नगर शॉपिंग महोत्सव' अधिक लोकप्रिय झाला. 

ग्राहकांना मनोरंजनाची मेजवानी

या चार दिवसांच्या महोत्सवामध्ये सहभागी होणारे हजारो ग्राहक, तसेच विविध स्टॉलवरील त्यांच्या खरेदीमुळे अर्थकारणाला मिळणारी गती, आकर्षक योजनांमुळे खरेदीबरोबर बक्षीस जिंकण्याचा मिळणारा आनंद, यामुळे हा महोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. महोत्सवादरम्यान रोज सायंकाळी होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मनोरंजनाची मेजवानीही मिळते. 

शंभराहून अधिक स्टॉल

सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक उत्पादने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्पादने, तसेच गृहबांधणी, वित्तसेवा, वाहन उद्योग, खाद्यपदार्थ यांसह अन्य विविध उत्पादनांचे, विविध आकारांचे तब्बल शंभराहून अधिक स्टॉल यंदाच्या महोत्सवात आहेत. 
 

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क 
पवन बोंदर्डे ः 8999008595, सचिन देशमुख : 9850964065, महेश दिघे : 9850411718, अमोल भंडारे : 7972049383 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.