'तोच खेळ पुन्हा!' इस्लामपूर नगरपालिकेत सभा तहकुबीचा गोंधळ कायम

२२ मार्चची तहकूब करण्यात आलेली सभा
'तोच खेळ पुन्हा!' इस्लामपूर नगरपालिकेत सभा तहकुबीचा गोंधळ कायम
'तोच खेळ पुन्हा!' इस्लामपूर नगरपालिकेत सभा तहकुबीचा गोंधळ कायमsakal
Updated on

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : 'तोच खेळ पुन्हा! पुन्हा...!' याचा प्रत्यय इस्लामपूर नगरपालिकेच्या सभेत आजही आला. २२ मार्चची तहकूब करण्यात आलेली सभा आज पुन्हा आयोजित करण्यात आली होती. त्यातही सभा तहकूब करण्याचा गोंधळ झाला. आज लग्नाचे मुहूर्त आहेत आणि पदाधिकाऱ्यांना तिकडे जायचे आहे, असे जुजबी कारण देत सभा तहकूब करण्याची मागणी राष्ट्रवादीने ताणून धरली. नगराध्यक्षांनी उच्च न्यायालयाच्या वकिलांचा कायदेशीर सल्ला घेत चार वाजेपर्यंत सभा तहकूब करत त्यानंतर मात्र सभा होणार असल्याचे जाहीर केल्याने तात्पुरती सभा तहकूब करण्यात आली आहे.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत आज सकाळी साडेअकरा वाजता सभा सुरू झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी प्रारंभीच मागील दोन सभांमध्ये विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जो गोंधळ घातला, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, मगच सभेचे काम पुढे सुरू करावे अशी भूमिका घेतली.

'तोच खेळ पुन्हा!' इस्लामपूर नगरपालिकेत सभा तहकुबीचा गोंधळ कायम
जळगाव : विद्यार्थ्यांना पंतप्रधानांना भेटण्याची सुवर्णसंधी

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. विषयपत्रिकेतील विषयांना हात घालताच राष्ट्रवादीच्या शहाजी पाटील यांनी वारंवार त्याकडे अंगुलीनिर्देश करत सभेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्षांनी थेट शहराच्या विकासकामांपेक्षा तुम्हाला विषयपत्रिका सोडून अन्य विषयांवरच चर्चा करायची आहे का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीवर टीका केली. तुम्ही शहराला वेठीस धरत आहात. आजची सभा फक्त विषय पत्रिकेतील विषयांवर चालेल. त्या बाहेरचे विषय चर्चेत येणार नाहीत, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान गटनेते संजय कोरे यांनी आज लग्नांचे मुहूर्त असल्याने आणि नगरसेवकांना संबंधित लग्नांना उपस्थित राहायचे असल्याने आजची सभा तहकूब करून पुढच्या आठवड्यात घ्यावी अशी सूचना मांडली. कोरे यांनी १५ नगरसेवकांच्या सह्यासह लेखी निवेदन पीठासन अधिकाऱ्यांना सादर केले.

'तोच खेळ पुन्हा!' इस्लामपूर नगरपालिकेत सभा तहकुबीचा गोंधळ कायम
नाशिक : ख्रिसमस ट्रीसह सजावटीच्या वस्तूंना वाढली मागणी

ही सभा तहकूब होणार नाही, अशी ठाम भूमिका नगराध्यक्षांनी घेतली. शिवसेनेचे नेते आनंदराव पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादी काँग्रेसला ही सभा होऊ द्यायची नाही, सभागृहाची मुदत संपण्याची ते वाट पाहत आहेत, असा आरोप केला. वैभव पवार, अमित ओसवाल, शकील सय्यद यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेला आक्षेप घेत आजची सभा झालीच पाहिजे ल, सभेच्या सुरुवातीला कोरम पूर्ण झाला आहे, पुढचे कामकाज नगराध्यक्षांनी चालवावे, अशी भूमिका घेतली. शहराच्या विकासापेक्षा लग्न महत्त्वाचे असेल तर राष्ट्रवादीने खुशाल जावे, बाकीची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू, अशी भूमिका आनंदराव पवार यांनी घेताच राष्ट्रवादीच्या शहाजी पाटील, विश्वास डांगे, चिमण डांगे, खंडेराव जाधव, संजय कोरे यांनी आपला मुद्दा तीव्रतेने रेटला. नगराध्यक्ष निशिकांत पाटील सभा तहकूब करण्याच्या ठाम विरोधात होते. 'तुम्हाला कुठे जाऊन चॅलेंज करायचे ते करा, मात्र मी शहराचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही, प्रशासकीय विषय आहेत ते मंजूर झालेच पाहिजेत. ते न झाल्याने शहराचे नुकसान होईल. त्यामुळे आजची सभा होईलच' अशी ठाम भूमिका घेतली.

'तोच खेळ पुन्हा!' इस्लामपूर नगरपालिकेत सभा तहकुबीचा गोंधळ कायम
अध्यक्षांवरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध; बेळगावसह परिसर बंद

मात्र दरम्यानच्या काळात नगराध्यक्ष आणि शहाजी पाटील, नगराध्यक्ष आणि संजय कोरे व चिमन डांगे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान आनंदराव पवार यांनी पत्रिकेवरील सगळेच विषय रद्द करावेत, राष्ट्रवादीला केव्हा वेळ आहे बघू आणि त्यानंतर सभा घेऊ, मग त्यासाठी कितीही कालावधी लागुदे' अशी भूमिका घेतली. तरीही राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आणि गोंधळ वाढत गेल्याने नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी एक तासाची वेळ घेत उच्च न्यायालयाच्या वकिलांकडे कायदेशीर सल्ला घेतला जाईल आणि मगच पुढचा निर्णय घेऊ असे सांगत सभा तहकूब केली. एक तासानंतर नगराध्यक्ष पुन्हा सभागृहात आले आणि अवघ्या अर्ध्या मिनिटांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या मागणीचा संदर्भ देत चार वाजल्यानंतर सभेचे कामकाज पुढे सुरू राहील, असे जाहीर केले. चार नंतर काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()