सांगली : आम्ही सदस्यपदाचाही राजीनामा फडणवीसांकडे देऊ

बालटे, वाळवेकर, मुंडगणूर; आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नका
politics
politicssakal
Updated on

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष व तीन सभापतींनी ‘ते सारे पक्षनिष्ठ आणि नव्याने पद मागणारे पक्षाशी निष्ठा नसलेले’, असा भेदभाव करून आमचा अपमान केला आहे. राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्यांनी मोठी पक्षनिष्ठा दाखवली आहे. एवढे सगळे होत असताना सदस्य पदावर राहण्यात आम्हाला रस नाही. आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन दिवसांत सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असा इशारा अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर आणि मनोज मुंडगणूर यांनी आज दिला.

भाजप कोअर कमिटीची आज बैठक होणार होती. ती एक दिवस पुढे ढकलण्यात आली. ती उद्या (ता. १) सकाळी होणार आहे. त्याआधी अध्यक्ष व सभापतींनी ‘लेटर बाँब’ फोडत पद मागणारे सदस्य आणि त्यासाठी धडपड करणाऱ्या नेत्यांवरच बोट उचलले. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज नाराज गटातील सदस्यांनी एकमेकांशी संवाद साधत भूमिका जाहीर केली.

politics
Share Market : शुभमुहूर्तावर करा गुंतवणूक!

श्री. वाळवेकर म्हणाले, ‘‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्ह्यातील वरिष्ठ नेते यांनी दिलेल्या आदेशानुसार पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. पुढे काँग्रेस काय करेल, राष्ट्रवादी काय करेल, आपले पदाधिकारी होतील की जातील, याची चिंता या मंडळींनी करण्याचे कारण नाही. त्यासाठी पक्ष सक्षम आहे. खुर्चीचा फार हव्यास चांगला नाही. तीन महिन्यांनी ती जाणारच आहे. इतरांना संधी देऊन पक्षाबद्दल सन्मान आणि अन्य सहकाऱ्यांबद्दल आदरभाव राखायला हवा होता. सध्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका आणि पत्रातील वाक्ये पाहून खेद वाटतो.’’

श्री. बालटे म्हणाले, ‘‘पक्ष निष्ठेचे धडे शिकवणारे काल कुठल्या पक्षात होते, परवा कुठल्या पक्षात होते? राजीनामा द्यायचा नसेल तर वेगळी कारणे सांगा, आमच्या निष्ठेवर बोट ठेवू नका. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर करू, मात्र आम्ही भाजपमध्येच राहू. आमचा अपमान म्हणजे आमच्या नेत्यांचा अपमान आहे. तो आम्ही बघत बसणार नाही.’’

politics
गुहागर : पक्ष बांधणी करणारे पहिल्या रांगेतून गायब

श्री. मुंडगणूर म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने या विषयाला ताणवले आहे, ते भाजपसाठी अपमानजनक आहे. लोक थट्टा करत आहेत. राज्यातील, जिल्ह्यातील नेत्यांच्या निर्णयाचा अपमान करून पदावर राहण्यात कसले शौर्य आहे. आम्ही या साऱ्याला रामराम करण्याची तयारी केली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.