पदाधिकाऱ्यांचा लेटरबॉंब! खासदार गट बदलाच्या मोहिमेला ब्रेक लागणार?

भाजपविषयी निष्ठा नसणाऱ्यांच्या हट्टासाठी पदाधिकारी बदल कशासाठी करायचा?
political leaders clipart
political leaders clipartGoogle
Updated on
Summary

भाजपविषयी निष्ठा नसणाऱ्यांच्या हट्टासाठी पदाधिकारी बदल कशासाठी करायचा?

सांगली : भाजपविषयी निष्ठा नसणाऱ्यांच्या हट्टासाठी पदाधिकारी बदल कशासाठी करायचा, असा सवाल करीत जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पक्षनिष्ठा नसलेल्या नेत्याविषयी शंका उपस्थित करत हा लेटरबॉंब टाकला आहे. त्यांनी हे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना दिले आहे. या पत्रामुळे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याच्या मागणीला प्रतिशह बसला आहे. त्यामुळे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पदाधिकारी बदलाच्या (खासदार गट) मोहिमेला मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह तीन सभापतींनी राजीनामा देण्यास विरोध केला आहे. त्यांनी खरमरीत लेखी पत्रच भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना दिले. आता पत्रावर भाजप कोअर कमिटी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या सोमवार-मंगळवरी राजीनाम्याचे मुहूर्त होते. त्यानुसार खासदार समर्थक प्रमोद शेंडगेंनी राजीनामा दिला. मात्र सत्ताधारी आघाडीतील काही नेत्यांनी बदलाला विरोध दर्शविला. गेले दोन दिवस व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर सुरू असलेला विरोध अध्यक्षा कोरे, उपाध्यक्ष डोंगरे, सभापती सर्वश्री माळी, पाटील, पवार यांनी आज पत्राद्वारे स्पष्ट केला.

political leaders clipart
'स्वत:चं पोरं बसवलंय मंत्रीमंडळात; ST कामगारांची मुलं धाडलेत मृत्यूच्या दारात'

भाजपबद्दल निष्ठा नसणाऱ्यांसाठी पदाधिकारी बदल कशासाठी करायचा? पक्ष बदलणारे, बदलण्याचे धमकी देणाऱ्यावर किती विश्वास कसा ठेवावा? जि.प.त भाजपला बहुमत नाही. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यास पुन्हा पक्षाचे पदाधिकारी होतील याची खात्री आहे का? महापालिकेत पक्षाचे बहुमत असताना महापौर झाला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भरवशावर काही नेते बोलतात. त्यांची जाहीर, खासगीत चर्चा वेगळी आहे. यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. घटक पक्षातील रयत आघाडी, घोरपडे गट, शिवसेना पक्षालाही यात विश्‍वासात घेतले नाही. नेत्यांच्या आदेशानंतरच आम्ही राजीनामा देवू. झेडपी निवडणूक फेब्रुवारी २०२२ ला होईल. जानेवारीत आचारसंहिता लागल्यानंतर विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार नाही. नवीन पदाधिकाऱ्यांना वेळ न मिळाल्याने कामांवर परिणाम होईल. या पार्श्‍वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय तूर्त थांबवावा, असे आवाहन या पत्राद्वारे कोअर कमिटी व जिल्हा अध्यक्षांना केले आहे.

पक्षाला सोडचिठ्ठी देणारे सूचक-अनुमोदक कसे ?

पदाधिकारी बदलासाठी आग्रही असलेले खासदार पाटील यांचे समर्थक सदस्य प्रमोद शेंडगे यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनामा पत्रावर भाजप सोडलेले सरदार पाटील, नितीन नवले हे सूचक, अनुमोदक आहेत. याचा अर्थ काय? असाही सवाल या पत्रात केला आहे.

political leaders clipart
मुंबईकरांना मोठा दिलासा! एक दिवसाच्या लोकल प्रवासासाठी मिळणार तिकीट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.