सांगली, मिरज Railway Station बॉम्बने उडविण्याची कसाबकडून धमकी; फोनमुळे पोलिस दलात उडाली खळबळ

पोलिसांना रेल्वे स्थानकावर काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही.
Sangli and Miraj Railway Station
Sangli and Miraj Railway Stationesakal
Updated on
Summary

या फोनमुळे पोलिसांनी प्रचंड तारांबळ उडाली. अवघ्या दहा मिनिटांत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकावर धाव घेऊन तेथे सुमारे चार तास शोधमोहीम राबविली.

सांगली : सांगली आणि मिरज रेल्वेस्थानक (Sangli and Miraj Railway Station) बाँबने (Bomb) उडवून देण्याची धमकी देणाऱ्यावर शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्या संशयिताचे नाव रियाज कसाब (Riyaz Kasab) असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या एका फोनमुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती. रेल्वे प्रवासी आणि पोलिस प्रशासन यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास सांगली शहर पोलिस ठाण्यास (Sangli Police) फोनची रिंग वाजली. ठाणे अंमलदाराने फोन उचलल्यावर पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने, रियाज कसाब बोलत असल्याचे सांगितले. पाकिस्तानातील लाहोर येथून आपण सांगलीत आलो असून, आपण दहशतवादी आहोत. आपल्यासमवेत अन्य ५ व्यक्ती आहेत. जवळ असलेल्या आरडीएक्सने रेल्वे स्थानक उडविण्याची धमकी त्याने दिली.

Sangli and Miraj Railway Station
Private School : आठ शाळांना बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा E-mail; शहरात भीतीचं वातावरण, पोलिस प्रशासन सतर्क

या फोनमुळे पोलिसांनी प्रचंड तारांबळ उडाली. अवघ्या दहा मिनिटांत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकावर धाव घेऊन तेथे सुमारे चार तास शोधमोहीम राबविली. रेल्वेस्थानक परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. दुसरीकडे पोलिसांची आरडीएक्सची शोधमोहीम सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पोलिस फौजफाटा परिसरात तैनात होता. पोलिसांना रेल्वे स्थानकावर काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही.

Sangli and Miraj Railway Station
'संजय पाटलांचं नशीब बदलणारा माई का लाल अद्याप जन्माला यायचाय'; भाजप खासदाराचा कोणाला इशारा?

त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने हा दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. अज्ञात व्यक्तीविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला होता. पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्यामुळे संशयित कसाबविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.