सांगलीत अण्णा भाऊंचा पुतळा नसल्याची खंत

समाजसुधारक, लोककवी, लेखक, लोकशाहीर म्हणून ओळखले
birthday of Lokshahir literature Annabhau Sathe special story contribution of the film industry
birthday of Lokshahir literature Annabhau Sathe special story contribution of the film industrysakal
Updated on

सांगली : क्रांतिकारकांच्या वाळवा तालुक्यातील वाटेगावचे सुपुत्र, लेखक, साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे त्यांच्या जीवनप्रवासात उपेक्षित राहिले. मृत्यूनंतरही त्यांचे नातेवाईक, त्यांच्या चळवळीतील अनुयायी यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. जगभरात ज्यांचे विचार पोहोचले, त्या अण्णा भाऊंना त्यांच्या जन्मभूमीने देखील उपेक्षितच ठेवले. गेल्या ५३ वर्षांत त्यांचा सांगलीत पुतळा उभा राहू शकला नाही, याची खंत त्यांचे अनुयायी व्यक्त करतात.

समाजसुधारक, लोककवी, लेखक, लोकशाहीर म्हणून ओळखले जाणाऱ्या अण्णा भाऊंचा जन्म १ ऑगस्ट, १९२० रोजी वाटेगाव येथे झाला. मोजकेच दिवस शाळा पाहिलेल्या अण्णा भाऊंची साहित्य क्षेत्रातील भरारी पाहिली, तर आश्‍चर्यचकित होण्याची वेळ होते. मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. ‘फकिरा’ने तर साहित्य क्षेत्रात इतिहासच निर्माण केला. लघुकथांचे १९ संग्रह, १४ लोकनाट्ये, १२ पटकथा, ११ पोवाडे, गाणी, प्रवासवर्णन, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. देशातील २७ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले. भारत सरकारने त्यांच्या नावाने टपालतिकीट प्रकाशित केले. मुंबईतील उड्डाणपुलासह अनेक ठिकाणी इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले.

उपेक्षित समाजाचे जीवन साहित्यातून मांडणारे अण्णा भाऊ मात्र त्यांच्या जीवनात उपेक्षित राहिले. त्यांच्या साहित्याची दखल रशियासारख्या देशांनी घेतली. परंतु जन्मभूमीत ते अधिकच उपेक्षित राहिले. आज जन्मभूमी वाटेगावात त्यांचे सभागृह आहे. परंतु जिल्ह्यात त्यांचा पुतळा उभा राहू शकला नाही, याची खंत अनेकांना वाटते. सांगलीत त्यांचा पुतळा उभा करण्यासाठी कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागले.

आंदोलनानंतर केवळ तीन गुंठे जागा कर्मवीर चौकात देण्यात आली. ती सुशोभिकरणासाठी म्हणून मंजूर केली आहे. परंतु सांगलीत अण्णा भाऊंचा पुतळा उभारला जावा, तसेच त्यांचे स्मारक व्हावे, ही मागणी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. २०२० हे अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले. त्यांचा सांगलीत पुतळा व स्मारक उभारले जावे, यासाठी अनुयायांना लढा उभारण्याची गरज भासू लागली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकनेते राजारामबापू पाटील हे एकाच तालुक्यातील आहेत. दोघांचा जन्मही १ ऑगस्टला झालेला आहे. सांगलीत अण्णा भाऊ आणि राजारामबापू यांचे स्मारक व पुतळे एकाच वेळी उभारले जावेत. तसेच, एकाच वेळी त्याचे उद्‌घाटन व्हावे, अशी आमची मागणी आहे.

- गॅब्रिएल तिवडे, अध्यक्ष, अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.